रियलमी 3 विरुद्ध रेडमी नोट 7, बघा कोणता फोन विकत घेणे असेल फायद्याचे

ओपोचा सब-ब्रँड म्हणून सुरवात करणारी रियलमी आता भारतात एक वेगळी कंपनी म्हणून काम करत आहे. रियलमी ने यावर्षी आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सोमवारी भारतीय मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन रियलमी 3 नावाने लॉन्च केला गेला आहे. लॉन्चच्या वेळी स्पष्ट झाले होते कि कंपनी या फोनच्या माध्यमातून शाओमीच्या लेटेस्ट हँडसेट रेडमी नोटला टक्कर देईल. आम्ही तुम्हाला या दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची तुलना करून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कि रियलमी 3 पेक्षा चांगला रेडमी नोट 7 स्मार्टफोन आहे का?

किंमत आणि उपलब्धता
रियलमी 3 पाहता या डिवाइसचा पहिला सेल 12 मार्चला होईल. तुम्ही हा फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या ऑफिशियल साइट वरून विकत घेऊ शकाल. रियलमी 3 च्या 3जीबी रॅम वाल्या मॉडेलची किंमत 8,999 रुपये आहे. तर 4जीबी वाला वेरियंट 10,999 रुपयांमध्ये घेता येईल. चांगली बाब अशी कि जर तुम्ही एचडीएफसी कार्डने खरेदी केली तर तुम्हाला 500 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. फोन डायमंड ब्लॅक, रेडिएंट ब्लू आणि ब्लॅक रंगांत मिळेल.

तसेच भारतात रेडमी नोट 7 ची सुरवाती किंमत 9,999 रुपये आहे. या किंमततीत 3 जीबी रॅम/32 जीबी स्टोरेज वेरिएंट मिळेल. वहीं, डिवाइस के 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज वेरिएंट की किंमत 11,999 रुपये आहे. रेडमी नोट 7 चा पहिला फ्लॅश सेल 6 मार्चला दुपारी 12 वाजता होईल. रेडमी नोट 7 स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट मी.कॉम, ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि मी होम स्टोर वरून विकत घेता येईल.

वनप्लस 7 चा वीडियो आला समोर, या फोन बनवेल यशाचे रेकॉर्ड, बघा पहिला लुक

डिजाइन व डिस्प्ले
रियलमी 3 ची बॉडी ग्लासने बनली आहे आणि मागील पॅनल मध्ये तुम्हाला डायमंड टेक्सचर मिळेल. फोन किनाऱ्यावर थोडा जास्त कर्व्ड आहे आणि ज्यामुळे पकड चांगली होते. या फोन मध्ये तुम्हाला 6.2—इंचाची स्क्रीन मिळेल. कंपनी ने हा 19:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 88.30% आहे आणि हा एचडी+ स्क्रीन रेजल्यूशन सह उपलब्ध आहे.

रेडमी नोट 7 दिसायला खूप शानदार आहे. यात वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 6.3 इंचाचा फुल एचडी+ (1080×2340 पिक्सल) डिस्प्ले आहे ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. स्क्रीन प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर झाला आहे.

सॉफ्टवेयर आणि प्रोसेसर
रियलमी 3 स्मार्टफोन मीडियाटेक हेलियो पी70 चिपसेट वर चालतो आणि बजट नुसार हा खूप दमदार म्हणता येईल. फोन मध्ये 2.1गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड वाला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. भारतीय बाजारात कंपनी ने हा 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी मध्ये सादर केला आहे. रियलमी 3 मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी पर्यंतचे कार्ड वापरू शकता.

तसेच रेडमी नोट 7 पाहता यात प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये रियलमी 3 प्रमाणे 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आहे.

शाओमी घेऊन येत आहे अजून एक स्वस्त फोन रेडमी 7, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट

कॅमेरा
रियलमी 3 मध्ये तुम्हाला डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याचा मेन सेंसर 13एपमी चा आहे जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. हा फोन तुम्हाला मोठा सेंसर देतो आणि तुम्ही कमी प्रकाशात पण चांगले फोटो घेऊ शकाल. तर दुसरा सेंसर 2एमपी चा आहे जो डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. फोन मध्ये तुम्हाला पीडिएएफ फोस्ट फोकस, नाइट स्केप, पोट्रेड मोड आणि क्रोमा बूस्ट सारखे ऑप्शन मिळतील.

सेल्फी पाहता या फोन मध्ये तुम्हाला 13एपमी चा एआई कॅमेरा मिळेल. कंपनी ने हा एफ/2.0 अपर्चर सह सादर केला आहे. सोबत ब्यूटिफिकेशन मोड आणि एचडीआर चा ऑप्शन पण मिळेल.

रेडमी नोट 7 मध्ये बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा सॅमसंग प्राइमरी सेंसर तसेच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी
दोन्ही फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच यात डुअल सिम सपोर्ट आहे आणि दोन्ही सिम सह तुम्हाला 4जी वोएलटीई मिळेल. त्याचबरोबर वाईफाई आणि ब्लूटूथ सपोर्ट पण आहे. डेटा व चार्जिंग साठी माइक्रो यूएसबी पोर्ट आहे. सिक्योरिटी पाहता रेडमी नोट 7 आणि रियलमी 3 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर सह फेस अनलॉक पण मिळेल.

तसेच पावर बॅकअप साठी रियलमी 3 मध्ये 4,230 एमएएच ची बॅटरी आणि रेडमी नोट 7 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी व्यतिरिक्त दोन्ही फोन जवळपास एक सारख्याच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सह येतात, ज्यामुळे दोन्ही एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत. पण किंमत पाहिलीत तर रियलमी 3 तुम्हाला थोडा स्वस्त मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here