Categories: बातम्या

26 मार्चला भारतात लाँच होईल स्वस्त POCO C61 स्मार्टफोन, ब्रँडने शेअर केला टिझर

Poco च्या बजेट स्मार्टफोन POCO C61 च्या लाँचची तारीख जाहीर झाली आहे. हा पुढच्या आठवड्यात 26 मार्चला भारतीय बाजारात लाँच केला जाईल. तसेच फोनचे स्पेसिफिकेशन आणि डिझाईनचा खुलासा झाला होता. तसेच, आज ब्रँडने डिव्हाईस सादर होण्याची तारीख सांगितली आहे. चला, पुढे नवीन टिझर आणि संभावित फिचर्सची माहिती जाणून घेऊया.

POCO C61 भारतातील लाँचची तारीख

  • मोबाईल कंपनी पोकोने आपल्या नवीन डिव्हाईस POCO C61 बद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे. त्याचबरोबर मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर पण लाईव्ह झाली आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की मोबाईल फोन 26 मार्चला दुपारी 12:00 वाजता लाँच केला जाईल.
  • मोबाईलला टिझरमध्ये ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये दाखविण्यात आले आहे. तसेच यात कॅमेरा लेन्स पण दिसून येत आहे.
  • हे पण कंफर्म झाले आहे की स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 6GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमची सुविधा असणार आहे, ज्यामुळे युझर्स 12GB पर्यंत मेमरीचा उपयोग करू शकतात.

POCO C61 डिझाईन

फोनची डिझाईन पाहता मायक्रोसाइटवर समोर आलेल्या माहितीनुसार डिव्हाईसमध्ये रेडिएंट रिंग डिझाईन आणि सर्कुलर कॅमेरा माड्यूल असणार आहे. ज्यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश मिळेल. फोनची फ्रंट पॅनल पाहता हा फ्लॅट डिस्प्लेवर आधारित ठेवला जाईल.

Poco C61 ची किंमत (लीक)

  • समोर आलेल्या लीक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की पोको C61 दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच होऊ शकतो.
  • डिव्हाईसचे 4GB रॅम + 64GB स्टोरेजची किंमत जवळपास 7,499 रुपये सांगण्यात आली आहे.
  • स्मार्टफोन 6GB रॅम + 128GB चे स्टोरेज ऑप्शन भारतात 8,499 रुपये असण्याची अपेक्षा केली जात आहे.
  • कलर ऑप्शन पाहता Poco C61 ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन सारख्या तीन कलरमध्ये येऊ शकतो.

Poco C61 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

डिस्प्ले: पोको सी61 फोनमध्ये 6.71 इंचाचा IPS LCD HD+ डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. यावर 1650 x 720 पिक्सल रिजॉल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 500 निट्स पीक ब्राइटनेस दिली जाऊ शकते. हेच नाही तर स्क्रीनच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन मिळू शकते.
प्रोसेसर: नवीन पोको फोनमध्ये एंट्री लेव्हल हेलियो जी36 चिपसेट लावला जाऊ शकतो.
स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत हा 4 जीबी आणि 6 जीबी रॅम + 64 जीबी तसेच 128 जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच होऊ शकतो.
कॅमेरा: पोको सी 61 मध्ये ड्युअल कॅमेरा मिळण्याचे कंफर्म झाले आहे. ज्यात 8-मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 0.08-मेगापिक्सलची लेन्स दिली जाऊ शकते. तसेच, सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत पोको सी61 मध्ये 5,000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंगला सपोर्ट मिळू शकतो.

Published by
Kamal Kant