POCO F6 Deadpool Edition स्मार्टफोन झाला भारतात लाँच, जाणून घ्या काय आहे खास

पोकोने मार्वल सह भागेदारी करत भारतात POCO F6 Deadpool Edition लाँच केला आहे. याची खासियत ही आहे की यात बॅक पॅनलवर डेडपूल आणि वूल्वरिन डिझाईन पाहायला मिळते. तसेच डिव्हाईस भारतसाठी एक्सक्लूसिव्ह ठेवला गेला आहे. चला, पुढे POCO F6 डेडपूल एडिशनची किंमत, उपलब्धता आणि स्पेक्स सविस्तर जाणून घेऊया.

POCO F6 डेडपूल एडिशनची किंमत आणि उपलब्धता

POCO F6 डेडपूल लिमिटेड एडिशनची किंमत भारतात 33,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा 12GB रॅम +256GB स्टोरेज व्हेरिएंट मध्ये सादर झाला आहे. याची सेल येत्या 7 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर सुरु होईल.
युजर्स HDFC बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून फोनवर 4,000 रुपयांपर्यंतचा इंस्टंट डिस्काऊंट मिळू शकतो.
ऑफर नंतर POCO F6 Deadpool Limited Edition फक्त 29,999 रुपयांना मिळेल.

POCO F6 डेडपूल एडिशनची वैशिष्ट्ये

POCO F6 डेडपूल एडिशन मध्ये रेड कलरचा बॅक पॅनल दिसत आहे. यात डेडपूल आणि वूल्वरिन लूक देण्यात आला आहे. कॅमेऱ्याकडे LED फ्लॅश रिंगमध्ये पण डेडपूलचे डोळे दिसत आहेत. डिव्हाईसच्या कडा ब्लॅक रंगात आहेत ज्यामुळे रेड-ब्लॅक थीम दिसत आहे. फोनच्या बॉक्समध्ये चार्जरवर डेडपूलचा लोगो आहे आणि सिम इजेक्टर पिन डेडपूलच्या मास्कचा आकार देण्यात आला आहे.

POCO F6 डेडपूल एडिशनचे स्पेसिफिकेशन

POCO F6 डेडपूल एडिशन मध्ये स्पेसिफिकेशन पहिल्या सारखेच आहेत. ज्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.

  • डिस्प्ले: POCO F6 डेडपूल एडिशनमध्ये 6.67 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. यावर 1.5K पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 2,400 निट्स पीक लोकल ब्राईटनेस मिळतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन लावण्यात आले आहे.
  • प्रोसेसर: फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेट मिळतो. हा 3GHz पर्यंतचे हाय क्लॉक स्पीड देण्यामध्ये सक्षम आहे.
  • कॅमेरा: POCO F6 5 जी मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी आणि 8MP चा अल्ट्रावाईड सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20MP ची लेन्स मिळते.
  • बॅटरी: स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. याला चार्ज करण्यासाठी 90W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट आहे.
  • इतर: स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पिकर, डॉल्बी एटमॉस, पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP64 रेटिंग, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here