
मोबाईल ब्रँड पोको येत्या काही दिवसांमध्ये POCO F6 सीरिज सादर करू शकतो. यानुसार POCO F6 आणि POCO F6 Pro सारखे दोन मॉडेल येण्याची शक्यता आहे. सांगण्यात आले आहे की ही सीरिज पहिल्यापेक्षा काही चांगले बदल घेऊन येणार आहे. तसेच, दोन्हीमध्ये सामान्य फोन पोको एफ6 सर्टिफिकेशन साईट आयएमआयवर स्पॉट झाला आहे. ज्यामुळे याची लाँच लवकर होण्याचा अंदाज लावला जात आहे. चला, पुढे लिस्टिंगबाबत सविस्तर जाणून घेऊया.
POCO F6 आयएमआय लिस्टिंग
- POCO F6 फोनबद्दल जीएसएमचायना वेबसाईटने आयएमआय लिस्टिंगची माहिती शेअर केली आहे.
- नवीन POCO F6 फोन मॉडेल नंबर 24069PC21I आणि 24069PC21G सह IMEI डेटाबेसवर दिसला आहे. जो याच्या भारतीय आणि जागतिक मॉडेलसाठी आहे.
- रिपोर्टमध्ये IMEI डेटाबेसवर मॉडेल नंबर 24069RA21C सह Redmi Note 13 Turbo पण समोर आला आहे.
- तसेच POCO F6 आणि Redmi Note 13 Turbo चे मॉडेल नंबर एक सारखे आहेत. ज्यामुळे हे दोन्ही फोन स्पेक्सच्या बाबतीत एक समान असू शकतात.
- लीक रिपोर्टमध्ये हे पण सांगण्यात आले आहे की POCO F6 मध्ये क्वॉलकॉम SM8635 SoC असणार आहे. परंतु अजून याची घोषणा करण्यात आलेली नाही. ही Snapdragon 8s Gen 3 चिप असण्याची शक्यता आहे.
POCO F6 लाँच टाईमलाईन (लीक)
ब्रँडकडून सध्या POCO F6 सीरिजची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, मात्र लीकमध्ये सांगण्यात आले आहे की Redmi Note 13 Turbo मार्च आणि पोको एफ6 मोबाईल पुढील महिन्यात एप्रिलमध्ये एंट्री घेऊ शकतो. तसेच, पुढे पाहायचे आहे की कंपनीकडून कोणती घोषणा केली जाते.
POCO F5 चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: POCO F5 फोनमध्ये 6.67 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 1000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो.
- प्रोसेसर: पोको एफ5 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा 2.91GHz हाई क्लॉक स्पीड प्रदान करतो.
- स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत डिव्हाईसमध्ये 8GB रॅम + 256GB आणि 12GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन मिळतात.
- कॅमेरा: POCO F5 मध्ये कंपनीने बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा दिला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर मिळतो. तसेच, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: पोको एफ5 5जी मध्ये युजर्सना 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे याला चार्ज करण्यासाठी 67 वॉट फास्ट चार्जिंग मिळते.














