POCO M3 च्या इंडिया लॉन्चबद्दल अनेक दिवसांपासून इंटरनेट वर बातम्या येत होत्या. प्रत्येक ठिकाणी एकाच चर्चा होती कि 6,000एमएएच बॅटरी असलेला हा पावरफुल फोन भारतात कधी येईल. आता कंपनीने स्वतःहून मीडिया इनवाइट पाठवून आगामी स्मार्टफोन पोको एम3 च्या इंडिया लॉन्च डेटचा खुलासा केला आहे. Poco ब्रँडचा हा लेटेस्ट स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये धमाका करण्यास 2 फेब्रुवारी 2021 ला लॉन्च केला जाईल. भारताच्या आधी फोन गेल्या वर्षी ग्लोबल मार्केट मध्ये सादर केला गेला आहे.
इथे बघा इवेंट लाइव
वर सांगितल्याप्रमाणे Poco M3 स्मार्टफोनच्या भारतातील लॉन्च बद्दल कंपनीने मीडिया इनवाइट्स पाठवण्यास सुरवात केली आहे. ज्यात घोषणा केली आहे कि पोको एम3 फोन भारतात 2 फेब्रुवारी 2021 ला लॉन्च केला जाईल. हा लॉन्च इवेंट ऑनलाइन आयोजित केला जाईल, ज्याची लाइव स्ट्रीमिंग दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. इवेंट लाइव कंपनीच्या सोशल मीडिया चॅनेल व्यतिरिक्त फ्लिपकार्ट वर पण असेल.
हे देखील वाचा : Jio च्या आधी Airtel चे 5G नेटवर्क झाले तयार, जाणून घ्या कधी होईल लॉन्च, किती मिळेल स्पीड
Here's the quickest #POCOAMA ever. pic.twitter.com/vsNYXth4rj
— POCO India #POCOM3 (@IndiaPOCO) January 27, 2021
Poco M3
पोको एम3 ची डिजाइन पाहता हा फोन डुअल-टोन फिनिश असलेल्या रियर पॅनल सह सादर केला गेला आहे. POCO M3 स्मार्टफोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात डिस्प्ले तिन्ही बाजूंनी पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. आशा आहे कि पावर बटन फिंगरप्रिंट सेंसर एम्बडेड असेल.
हा फोन फुलएचडी+ पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या आयपीएस एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. तसेच, या फोन मध्ये 6.53 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच डिजाइन वर बनलेला असेल. पोको एम3 चा हा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयुआय 12 सह चालतो. सोबतच आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट फोन मध्ये आहे.
फोनचा रियर पॅनल पाहता पोको एम3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, ज्यात तीन कॅमेरा सेंसर वर्टिकली आहेत ज्यांच्या बाजूला एलईडी लाईट आणि लेंस डिटेल लिहिण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअपच्या डावीकडे कंपनीची ब्रँडिग आहे. ज्याचा प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. तर, दुसरीकडे फोनचे इतर अन्य दोन रियर कॅमेरा सेंसर पाहता यात 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर आहेत, त्यातील एक डेप्थ आणि एक मॅक्रो सेंसर आहे. हा फोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येते.
किंमत
ग्लोबली पोको एम3 चा 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 149 डॉलर (जवळपास 11,000 रुपये) आणि 4 जीबी + 128 जीबी स्टोरेज ऑप्शन 169 डॉलर (जवळपास 12,500 रुपये) मध्ये सादर केला गेला होता. आशा आहे कि भारतात पण फोनची किंमत 10 हजार रुपयांच्या आसपास सुरु होऊ शकते.
शाआोमी पोको एम3 व्हिडीओ















