POCO बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि कंपनी पोको X3 स्मार्टफोनच्या प्रो वर्जनवर काम करत आहे, जो टेक मंचावर Poco X3 Pro च्या नावाने सादर केला जाईल. आतापर्यंत हा फोन अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर स्पॉट केला गेला आहे, त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि हँडसेट लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीने आतापर्यंत पोको एक्स 3 प्रो बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आता या फोनच्या इंडिया लॉन्चबद्दल नवीन खुलासा झाला आहे, त्यानुसार हँडसेट भारतात 5G नव्हे तर फक्त 4G वेरिएंटसह मार्च मध्ये येईल. (poco x3 pro india launch timeline tipped 4g march)
यादिवशी होईल लॉन्च
टिप्सटर Debayan Roy ने ट्विट करून माहिती दिली आहे कि POCO X3 Pro भारतात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात एंट्री करेल. टिपस्टरला POCO X3 प्रो इंडिया लॉन्चची अचूक तारीख माहिती नाही, तो अंदाज लावत आहे कि हा फोन मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येऊ शकतो, ज्याचा अर्थ असा आहे कि डिवाइस बघण्यासाठी खूप जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही. POCO X3 प्रोच्या भारतातील लॉन्च डेटबद्दल लवकरच खुलासा केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा : FASTag बद्दल तुम्हाला पण समस्या आहे का? तर मग फक्त 10 पॉईंट्स मध्ये जाणून घ्या त्यांची उत्तरे
? Exclusive ? – Totally ,Totally & Totally confirmed that –
?Poco X3 Pro is launching in
India on ?1st / 2nd week of March.
???In case you don't know – it's a 4G Device .
?ReTweet will be Amazing ❤️??? pic.twitter.com/A7wKpKbVkL
— Gadgetsdata(Debayan Roy) (@Gadgetsdata) February 18, 2021
याआधी कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये POCO X3 सादर केला आहे. POCO X3 Pro बद्दल बोलायचे झाले तर फोन काही दिवसांपूर्वी BIS सर्टिफिकेशनवर स्पॉट केला गेला होता, त्यावरून स्पष्ट झाले होते कि फोन भारतात लवकरच सादर केला जाईल.
स्पेसिफिकेशन्स
POCO X3 प्रो स्पेसिफिकेशन अजून समोर आले नाहीत. पण, टिपस्टरचा दावा आहे कि हा 5G स्मार्टफोन नसेल. याचा अर्थ असा आहे कि भारतात 5G फोन लॉन्च करण्याबाबत POCO ला वाटते आहे कि 5G सेवांव्यतिरिक्त भारतात डिवाइस हा नेटवर्क लॉन्च करण्यात कोणताही अर्थ नाही. फोन पोको एक्स 3 च्या तुलनेत जास्त शक्तीशाली इंटर्नलसह येण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : 12GB रॅम आणि सर्वात पावरफुल प्रोसेसरसह वेबसाइटवर लिस्ट झाला OPPO Find X3 Pro, लॉन्च आला जवळ
आतापर्यंत आलेल्या अनेक बातम्यांनुसार, पोको एक्स3 प्रो मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच स्मार्टफोन मध्ये 48 मेगापिक्सल क्वाड-रियर कॅमेरा सेटअप पण असल्याचे समोर आले आहे.
POCO X3
POCO X3 कंपनीने 6.67-इंचाच्या FHD + डिस्प्लेवर सादर केला होता जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेटवर चालतो जो 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो. POCO X3 64MP क्वाड-कॅमेरा सिस्टम आणि 20MP फ्रंट-फेसिंग कॅमेरासह येतो. स्मार्टफोन 6,000mAh च्या बॅटरीसह येतो आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
