रियलमी गेली कित्येक दिवस आपली नवीन नंबर सीरिज टीज करत होती. इतके दिवस उत्सुकता वाढवल्यानंतर कंपनी अखेरीस आपल्या फॅन्सना मोठी भेट दिली आहे. कंपनीनं आपल्या नंबर सीरीजची नेक्स्ट जेनरेशन सादर करत realme 10 लाँच केला आहे. रियलमी 10 ग्लोबली लाँच झाला आहे जो काही दिवसांमध्ये भारतीय बाजारात येईल. रियलमी 10 स्मार्टफोन 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 सारख्या शानदार फीचर्सना सपोर्ट करतो. पुढे realme 10 Price आणि Specifications ची माहिती देण्यात आली आहे.
realme 10 launch Event
Realme 10 Specifications
रियलमी 10 स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असलेला हा फोन स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. रियलमी 10 डिस्प्ले 1000निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो तसेच याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Redmi 11A असेल कंपनीचा आगामी स्वस्त स्मार्टफोन; किंमत असू शकते 8 हजारांच्या जवळपास
रियलमी 10 स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड ओएसवर आधारीत रियलमी वन युआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. हा रियमली मोबाइल 8 जीबी डायनॅमिक रॅमला सपोर्ट करतो त्यामुळे realme 10 स्मार्टफोनला 16 जीबी रॅमची पावर मिळते. हा स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 Storage टेक्नॉलॉजीवर चालतो.
फोटोग्राफीसाठी रियलमी 10 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी 10 स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी रियलमी 10 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. हे देखील वाचा: स्वस्त 5G फोनच्या यादीत OPPO A58 5G ची एंट्री; वॉटरप्रूफ बॉडीसह 50MP Camera आणि 13GB RAM
Realme 10 Price
रियलमी 10 स्मार्टफोन पाच व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, दुसरा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज तर तिसरा व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. रियलमी 10 चे दोन व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह येतात ज्यात 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज आणि 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज आहे.
- realme 10 4GB RAM + 64GB Storage = $229 (जवळपास 18,500 रुपये)
- realme 10 4GB RAM + 128GB Storage = $249 (जवळपास 20,200 रुपये)
- realme 10 6GB RAM + 128GB Storage = $269 (जवळपास 21,900 रुपये)
- realme 10 8GB RAM + 128GB Storage = $279 (जवळपास 22,700 रुपये)
- realme 10 8GB RAM + 258GB Storage = $299 (जवळपास 24,300 रुपये)
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
