Redmi 11A स्मार्टफोन झाला टेना वेबसाइटवर लिस्ट

Redmi 10A

रेडमीचा एक नवीन मोबाइल फोन समोर आला आहे ज्याचं नाव रेडमी 11ए आहे. Redmi 9A आणि Redmi 10A नंतर Redmi 11A लाँच होऊ शकतो. हा रेडमी स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर दिसला आहे, त्यामुळे Xiaomi सब-ब्रँड Redmi लवकरच रेडमी 11ए लाँच करू शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे. पुढे Redmi 11A च्या फोटोजसह या स्मार्टफोनच्या अनेक महत्वाचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत.

Redmi 11A

रेडमी 11ए स्मार्टफोन टेनावर 22120RN86C मॉडल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. टेनावर कथितपणे Redmi 11A चे फोटोज देखील शेयर करण्यात आले आहेत ज्यात स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉचसह दिसत आहे. फोनच्या बॅक पॅनलवर डुअल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो ज्यात दोन वर्टिकल कॅमेरा लेन्स असू शकतात. सेन्सरच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे तसेच बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देखील असू शकतो. व्हॉल्युम रॉकर आणि पावर बटन फोनच्या उजवीकडे दिले जाऊ शकतात. फोनच्या स्पेसिफिकेशन्सची मात्र कोणतीही माहिती अजूनतरी समोर आली नाही. हे देखील वाचा: 822Km रेंज सह लाँच झाली नवीन लग्जरी इलेक्ट्रिक कार, 20 स्पीकरसह मिळत आहेत दमदार फीचर्स

Redmi 11A

Redmi 10A Price

रेडमी 10ए स्मार्टफोनबद्दल बोलायचं तर हा भारतीय दोन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. बेस मॉडेलमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 7,999 रुपये आहे. तसेच Redmi 10A 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. रेडमी 10ए Charcoal Black, Sea Blue आणि Slate Grey कलरमध्ये विकत घेता येईल. आशा आहे की Redmi 11A ची किंमत देखील 8 हजारांच्या बजेटमध्ये असेल.

Redmi 10A

Redmi 10A Specifications

या स्वस्त फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता रेडमी 10ए 29:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एचडी+ एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 12.5 वर चालतो यात मीडियाटेक हीलियो जी25 चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हा रेडमी फोन पावरवीआर8320 जीपीयूला सपोर्ट करतो. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Electric Vehicle Fire: पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटीला अचानक लागली आग! बॉडी विरघळली, पाहा व्हिडीओ

फोटोग्राफीसाठी Redmi 10A च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here