Realme 10 Series मध्ये कंपनी लवकरच एक नवीन स्मार्टफोन जोडणार आहे जो Realme 10T 5G नावाने लाँच होईल. हा मोबाइल फोन सर्वप्रथम थायलंडमध्ये सादर केला जाईल जो येत्या 21 मार्चला ऑफिशियल होईल. रियलमी थायलंडनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून रियलमी 10टी 5जी लाँचची माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करेल.
เซอร์ไพรส์ !! ? เตรียมพบกับ realme 10T 5G ที่มาพร้อมึวามเร็ว แรงระดับ 5G ? ขับเคลื่อนโดย Dimensity 810 5G Chipset และหน่วยความใหญ่สูงสุด 256GB ❤️ pic.twitter.com/dnbQTw1kR8
— realme Thailand (@realmeTH) March 14, 2023
Realme 10T 5G 21 मार्चला थायलंडमध्ये लाँच होईल. हा फोन सर्वप्रथम या मार्केटमध्ये पदार्पण करत आहे जो नंतर अन्य देशांमध्ये येऊ शकतो. कंपनीनं या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलचा फोटो शेयर केला आहे आहे ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचा खुलासा झाला आहे. तसेच उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देखील देण्यात आलं आहे.
रियलमी 10टी 5जी फोनबद्दल माहिती मिळाली आहे की हा मोबाइल मीडियाटेक डिमेनसिटी 810 प्रोसेसरसह लाँच केला जाईल. या फोनमध्ये 256जीबी स्टोरेज असल्याचा खुलासा देखील झाला आहे. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सरसह येऊ शकतो. तसेच Realme 10T 5G फोनमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन मिळेल. हे देखील वाचा: 15 हजारांच्या बजेटमध्ये Samsung Galaxy F14 5G फोन पुढील आठवड्यात येऊ शकतो भारतात लाँच
रियलमी 10 सीरीज
तुम्हाला माहित असेल की रियलमी कंपनीनं भारतीय बाजारात ‘10 सीरीज’ अंतगर्त आतापर्यंत चार स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे मोबाइल फोन realme 10, realme 10 Pro 5G, realme 10 Pro+ 5G आणि realme 10 Pro 5G Coca-Cola Edition नावानं सेलसाठी उपलब्ध आहेत. तसेच realme 10s चायना मध्ये आला आहे. या सीरीजमध्ये एकूण 5 स्मार्टफोन मॉडेल आहेत आणि आता Realme 10T 5G आल्यानंतर सहावा फोन देखील यात जोडला जाईल.
