15 हजारांच्या बजेटमध्ये Samsung Galaxy F14 5G फोन पुढील आठवड्यात येऊ शकतो भारतात लाँच

Samsung Galaxy M14 5G
Highlights

  • Samsung Galaxy F14 5G पुढील आठवड्यात भारतात लाँच होऊ शकतो.
  • फोन लाँचची माहिती न्यूज एजेंसी आयएएनएसच्या माध्यमातून समोर आली आहे.
  • हा 5जी सॅमसंग मोबाइल 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो.

सॅमसंगनं सांगितलं आहे की कंपनी येत्या 16 मार्चला भारतात दोन नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A54 5G आणि Samsung Galaxy A34 5G लाँच करणार आहे. हे दोन्ही मोबाइल भारतात येण्यापूर्वी एक नवीन बातमी समोर आली आहे त्यानुसार ही कोरियन कंपनी आपल्या ‘एफ’ सीरीजचा Samsung Galaxy F14 5G फोन देखील पुढील आठवड्यात भारतीय बाजारात येऊ शकतो. रिपोर्टनुसार या 5जी मोबाइलची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Samsung Galaxy F14 5G इंडिया लाँचची माहिती न्यूज एजेंसी IANS च्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की हा मोबाइल फोन पुढील आठवड्यात देशात ऑफिशियल केला जाऊ शकतो. हा एक लो बजेट 5जी फोन असू शकतो जो 15 हजारांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनची विक्री शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून होऊ शकते. विशेष म्हणजे सॅमसंगच्या गॅलेक्सी ‘एफ’ सीरीजचे फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरच विकले जातात.

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जी फोनमध्ये मिळू शकतात हे स्पेसिफिकेशन्स

मिळालेल्या माहितीनुसार हा सॅमसंग स्मार्टफोन 6,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग एक्सनॉस 1330 ऑक्टाकोर प्रोसेसर असू शकतो जो 2 x ARM Cortex-A78 कोर आणि 6 x ARM Cortex-A55 कोर सीपीयू असू शकतो. या फोनमध्ये 6 जीबी रॅम मिळू शकतो.

लीक्सनुसार, Samsung Galaxy F14 5G मध्ये 6.6 इंचाचा मोठा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकतो. ही एक एलसीडी पॅनलवर बनलेली 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन असू शकते. फोटोग्राफीसाठी या 5जी सॅमसंग फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो तर फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर मिळू शकतो.

Samsung Galaxy A14

सॅमसंग कंपनीनं आतापर्यंत गॅलेक्सी एफ14 5जी फोनच्या लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे सध्या फोनच्या लाँच डेट व समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्सची पुष्टी करता येत नाही. आशा आहे की 16 मार्चला गॅलेक्सी ए34 5जी आणि ए54 5जी फोनच्या इंडिया लाँचनंतर कंपनी Galaxy F14 5G टीज करेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here