Categories: बातम्या

4,230एमएएच बॅटरी असलेला रियलमी 3 फ्लिपकार्ट वर झाला लिस्ट, 4 मार्चला होईल लॉन्च

ओपो च्या सब-ब्रँड कंपनी रियलमी ने घोषणा केली आहे कि ते येत्या 4 मार्चला आपला नवीन स्मार्टफोन रियलमी 3 लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोन बद्दल आता पर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या डिजाईन आणि डिस्प्ले सह याच्या प्रोसेसर व इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली होती. तसेच आज हा फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लिस्ट केला गेला आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी ब्रँडचा आगामी स्मार्टफोन रियलमी 3 शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विकेल.

रियलमी 3 बद्दल फ्लिपकार्ट वर प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे. या प्रोडक्ट पेज वर फोनच्या लॉन्चची माहिती पण देण्यात आली ज्यानुसार रियलमी 3 चा लॉन्च ईवेंट 4 मार्चला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. फ्लिपकार्ट च्या या लिस्टिंग मधून एकीकडे रियलमी 3 आनलाईन प्लॅटफॉर्म वर फक्त फ्लिपकार्ट वरच विकला जाईल हे स्पष्ट झाले आहे आणि दुसरीकडे प्रोडक्ट पेज वर रियलमी 3 च्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती पण मिळाली आहे.

रियलमी 3 स्पेसिफिकेशन्स
फ्लिपकार्टच्या प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहे कि हा बेजल लेस ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला जाईल. फोनच्या नॉच मध्ये सिंगल सेल्फी कॅमेरा असेल. या लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि कपंनी आपला नवीन स्मार्टफोन 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर लॉन्च करेल. हा चिपसेट एआई टेक्नॉलॉजी सह येईल. तसेच सोबत लिस्टिंग मध्ये सांगण्यात आला आहे कि रियलमी 3 4,230 एमएएच बॅटरी वर लॉन्च केला जाईल.

​रियलमी 3 संबंधित अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती कंपनी द्वारा देण्यात आलेली नाही. पण आतापर्यंत समोर आलेले लीक्स पाहता हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित असेल तसेच या फोन मध्ये 6जीबी रॅम दिला जाऊ शकतो. चर्चा अशी आहे कि कंपनी हा फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये बाजारात आणू शकते ज्यांची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. तसेच दुसरीकडे आशा आहे कि कंपनी रियलमी 3 प्रो पण रियलमी 3 सोबत लॉन्च करू शकते.

Published by
Siddhesh Jadhav