Infinix GT 20 Pro आणि GT Book लॅपटॉपची लाँचची तारीख आली समोर, जाणून घ्या कसा असेल हा गेमिंग डिव्हाईस

इंफिनिक्स भारतात Infinix GT 20 Pro स्मार्टफोन आणि Infinix GT Book लॅपटॉप लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या वेबसाईट आणि सोशल मीडियावर डिव्हाईसबाबत प्रमुख माहिती शेअर केली आहे. तसेच, आता 91 मोबाईलला विशेष सूत्रांकडून लाँचच्या तारखेची माहिती पहिली मिळाली आहे. हा गेमिंग प्रोडक्ट्स येत्या 21 मे ला सादर होईल. चला, पुढे माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Infinix GT 20 Pro आणि GT Book भारतातील लाँचची तारीख आणि इतर माहिती

  • जीटी वर्से गेमिंग इकोसिस्टम अंतर्गत येत्या Infinix GT 20 Pro मोबाईल आणि GTBook लॅपटॉप 21 मे ला लाँच केला जाईल.
  • ब्रँड त्याचबरोबर जीटी वर्से गेमिंग अ‍ॅक्सेसरीजमध्ये मैगकेस, फिंगर स्लीव्स, कूलिंग फॅन, आरजीबी मॅट, आरजीबी हेडफोन आणि आरजीबी माऊस पण सादर करू शकतो.
  • इंफिनिक्स जीटी 20 प्रो मध्ये सायबर मेचा डिझाईन, मेचा लूप-LED इंटरफेस आणि गेम लाइटिंग इफेक्ट मिळेल.
  • इंफिनिक्स जीटीबुकमध्ये कस्टमाईजेबल आरजीबी लाइटिंग सह मेचा बार आणि चार-जोन लाइटिंग आरजीबी कीबोर्ड दिला जाईल.

Infinix GT 20 Pro चे स्पेसिफिकेशन (जागतिक)

इंफिनिक्स जीटी 20 प्रो ला काही दिवसांपूर्वी जागतिक स्तरावर एंट्री मिळाली आहे ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे. हा या स्पेक्ससह भारतात येऊ शकतो.

  • डिस्प्ले: Infinix GT 20 Pro 5G मध्ये 6.78-इंचाचा FHD+अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे यावर 144Hz रिफ्रेश रेट, 1,300 निट्सचा पीक ब्राईटनेस, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि Pixelworks X5 टर्बो गेमिंग डिस्प्ले चिपसेट देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर: फोनमध्ये परफॉरमेंससाठी MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसर आहे त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली-G610 MC6 जीपीयू आहे.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत मोबाईलमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजची सुविधा आहे.
  • कॅमेरा: Infinix GT 20 Pro 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108MP OIS असलेला Samsung HM6 सेन्सर, 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो सेन्सर लावला आहे. तसेच, फ्रंटला 32MP चा कॅमेरा आहे.
  • बॅटरी: Infinix GT 20 Pro मध्ये 45W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
  • इतर: फोनमध्ये पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी IP54 रेटिंग आणि सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
  • ओएस: Infinix GT 20 Pro 5G जागतिक स्तरावर अँड्रॉईड 14 आधारित HiOS 14 वर आधारित आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here