Moto G Stylus 5G 2024 झाला लाँच, यात मिळतो 32MP Selfie Camera आणि अ‍ॅडव्हान्स stylus pen

Motorola ने टेक मार्केटमध्ये आपला नवीन मोबाईल फोन Moto G Stylus 5G (2024) सादर केला आहे. हा मध्यम श्रेणी डिव्हाईस आहे जो stylus pen सह येतो. हा नवीन स्मार्टफोन सर्वप्रथम अमेरिकन बाजारात सेलसाठी उपलब्ध होईल ज्याची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Moto G Stylus 5G (2024) ची किंमत

मोटो जी स्टायल 5 जी (2024) स्मार्टफोन 8 जीबी रॅमवर लाँच करण्यात आला आहे, ज्याच्यासोबत 256 जीबी स्टोरेज मिळते. या मोबाईल फोनची किंमत $399.99 आहे. भारतीय चलनानुसार याची किंमत 33,500 रुपयांच्या आसपास आहे. सध्या नवीन Moto G Stylus 5G च्या भारतातील लाँचच्या स्थितीवर काही पण हे निश्चितपणे सांगता येणार नाही.

Moto G Stylus 5G (2024) चे स्पेसिफिकेशन

  • 6.7″ 120 हर्ट्झ ओएलईडी स्क्रीन
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1
  • 8 जीबी रॅम + 256 जीबी मेमरी
  • 32 एमपी सेल्फी कॅमेरा
  • 50 एमपी रिअर कॅमेरा
  • 30 वॉट 5,000 एमएएच बॅटरी

स्क्रीन : Moto G Stylus 5G (2024) स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही स्क्रीन OLED पॅनलवर बनली आहे जी 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200nit ब्राईटनेसला सपोर्ट करते.

प्रोसेसर : मोटो जी स्टायल 5 जी (2024) अँड्रॉईड 14 ओएसवर लाँच झाला आहे. हा मोबाईल Qualcomm च्या Snapdragon 6 Gen 1 चिपसेटसह बाजारात आला आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.

बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Moto G Stylus 5G (2024) ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50MP camera देण्यात आला आहे जो OIS फिचरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 13MP ultrawide लेन्स मिळते.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी हा नवीन मोटोरोला स्मार्टफोन 32MP selfie camera ला सपोर्ट करतो जो एफ/2.4 अपर्चरवर चालतो.

बॅटरी : Moto G Stylus 5G (2024) मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh battery देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 30W wired चार्जिंग तसेच 15W wireless चार्जिंग पण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here