Vivo Y200t आणि Vivo Y200 GT फोन 20 मे ला होईल मार्केटमध्ये लाँच, जाणून घ्या काय मिळेल खास

विवोने अलीकडेच सांगितले होते की येत्या 20 मे ला आपल्या होम मार्केट चीनमध्ये नवीन Vivo Y200 series 5G घेऊन येणार आहे. तसेच आज कंपनीने घोषणा केली आहे की या सीरिज अंतर्गत Vivo Y200t आणि Vivo Y200 GT फोन लाँच होईल. या दोन्ही स्मार्टफोनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo Y200 GT (लीक)

स्क्रीन : विवो वाय 200 जीटी स्मार्टफोनमध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेली 6.67 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन दिली जाऊ शकते. ही अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते ज्यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 1200 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 1200 निट्स ब्राईटनेस मिळू शकते.

प्रोसेसर : हा विवो 5 जी फोनला मीडियाटेक डाईमेंसिटी 7200 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो. ही 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला चिपसेट आहे जी 2.8 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालते.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला जाऊ शकतो. याच्या बॅक पॅनलवर ओआयएस फिचरसह 50 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स 882 सेन्सर मिळू शकतो. तसेच सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाणार असल्याची आशा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.

Vivo Y200t (लीक)

स्क्रीन : विवो वाय 200 टी स्मार्टफोनला 6.72 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेवर लाँच केले जाऊ शकते. यात एलसीडी दिली जाऊ शकते ज्यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 1000 निट्स हाई ब्राईटनेस मिळणार असल्याची चर्चा आहे.

प्रोसेसिंग : Vivo Y200t ला 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेटवर लाँच केले जाऊ शकते. तसेच हा ऑक्टाकोर प्रोसेसर 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रिअर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 50 मेगापिक्सल मेन सेन्सर तसेच 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर दिला जाणार असल्याची आशा आहे. तसेच सेल्फी व रिल्ससाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी Vivo Y200t मध्ये 6,000 एमएएच बॅटरी मिळू शकते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here