Home Featured Realme 5i नंतर कंपनी करत आहे Realme 6i ची तयारी, माहिती आली समोर

Realme 5i नंतर कंपनी करत आहे Realme 6i ची तयारी, माहिती आली समोर

काही दिवसांपूर्वी आम्ही माहिती दिली होती कि Realme आपल्या नवीन 6 सीरीजची तयारी करत आहे. अलीकडेच Realme 6 बीआईएस वर लिस्ट केला गेला होता. आता याचा अजून एक वेरियंट Realme 6i पण मलेशियाच्या साइट वर लिस्ट केला गेला आहे. जरी आता नाव सर्टिफिकेशनसाठी आले असले तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कि कंपनी आपल्या 5 सीरीज प्रमाणे नवीन 6 सीरीज मध्ये पण काही फोन आणण्याची तयारी करत आहे. बोलले जात आहे कि मार्च पासून कंपनी आपल्या नवीन रियमली 6 सीरीजची सुरवात करू शकते. मलेशियन सर्टिफिकेशन साइट वर रियलमी आरएम2040 मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे. मलेशिया व्यतिरिक्त फोन सिंगापुर सर्टिफिकेशन साइट आईएमडीए वर पण लिस्ट केला गेला आहे.

फोनच्या स्पेसिफिकेशनची अजूनतरी माहिती मिळाली नाही पण यात वाईफाई 5 गीगाहट्र्ज वाईफाईसाठी देण्यात आला आहे. तुम्हाला तर माहित आहे कि रियलमी 5आई, 5 सीरीजचा सर्वात स्वस्त फोन आहे त्यामुळे Realme 6i कडून फिन हीच अपेक्षा करता येईल.

भारतात Realme 5i फोन कंपनीने 4 जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. हा फोन कंपनीने 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मिनीड्रॉप नॉच डिस्प्ले सपोर्ट सह सादर केला आहे. तसेच रियलमी 5आई कलरओएस 6.1 आधारित एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेटला सपोर्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

रियलमी 5आई च्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर हा डिवाईस क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX386 सेंसर देण्यात आला आहे. सोबत हा फोन 8 मेगाक्सिलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Realme 5i मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

या फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 10 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. याची स्टोरेज मेमोरी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोन मध्ये 4G LTE, ब्लूटूथ 5.0, वाई-फाई आणि जीपीएस देण्यात आला आहे. फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.