Home बातम्या Realme 8 5G फोन 22 एप्रिलला होईल भारतात लॉन्च

Realme 8 5G फोन 22 एप्रिलला होईल भारतात लॉन्च

Realme इंडिया सीईओ माधव सेठ यांनी जेव्हापासून सांगितले आहे कि कंपनी ‘रियलमी 8’ सीरीजमध्ये 5G फोन पण जोडेल, तेव्हापासून रियलमी फॅन्स या फोनच्या इंडिया लॉन्चची वाट बघत आहेत. तसेच आज कंपनीने अधिकृतपणे घोषणा करून सांगितले आहे कि कंपनीचा आगामी 5जी फोन येत्या 22 एप्रिलला भारतात लॉन्च केला जाईल जो Realme 8 5G नावाने मार्केटमध्ये येईल. लॉन्च डेट सोबतच कंपनीने सांगितले आहे कि हा फोन मीडियाटेक डायमनसिटी 700 चिपसेटवर रन करेल. (Realme 8 5G India Launch on 22 April with Dimensity 700 processor)

Realme 8 5G च्या लॉन्चची माहिती कंपनीने मीडिया इन्वायटच्या माध्यमातून शेयर केली आहे. रियलमी इंडियाने सांगितले आहे कि कंपनी येत्या 22 एप्रिलला एका ऑनलाईन ईवेंटचे आयोजन करेल ज्याच्या मंचावरून रियलमी 8 5जी मॉडेल भारतीय बाजारात येईल. हा लॉन्च ईवेंट 22 एप्रिलच्या दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ज्याचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि यूट्यूब चॅनेलवर पण केले जाईल.

ऑफिशियल फोटो आला समोर

रियलमी 8 5जीच्या लॉन्च डेटची माहिती देण्यासोबत कंपनीने मीडिया इन्वायटमध्ये या फोनचा फोटो पण शेयर केला आहे. फोटो बघून समजले आहे कि हा मोबाईल फोन पंच होल डिस्प्लेवर लॉन्च केला जाईल ज्यात सेल्फी कॅमेरा असलेला होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे असेल. फोनची स्क्रीन बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. Realme 8 5G च्या उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण पण दिसत आहे.

हे देखील वाचा : OPPO A74 5G ची किंमत असेल 20,000 रुपयांपेक्षा कमी, Xiaomi-Realme आणि Vivo च्या नाकात होईल दम

असे असतील स्पेसिफिकेशन्स

समोर आलेल्या रिपोर्ट्स व लीकनुसार Realme 8 5G मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. म्हणजे रियलमीचा हा स्मार्टफोन LCD पॅनलसह सादर केला जाऊ शकतो. त्यामुळे रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 4G वेरिएंट प्रमाणे AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकत नाही.

रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यांच्यासोबत 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला जाऊ शकतो. रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्ज सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी 22 एप्रिलची वाट बघावी लागणार आहे.