OPPO A74 5G ची किंमत असेल 20,000 रुपयांपेक्षा कमी, Xiaomi-Realme आणि Vivo च्या नाकात होईल दम

OPPO A74 5G भारतात 20 एप्रिलला लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीने अधिकृतपणे मीडिया इनवाइट जारी करून याची माहिती दिली आहे. फोन ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडियावर लिस्ट झाला आहे. आशा आहे कि ओपो A74 5G चा भारतीय वेरिएंट या महिन्याच्या सुरुवातीला कंबोडिया आणि थायलंडच्या बाजारांमध्ये लॉन्च केल्या गेलेल्या मॉडेलपेक्षा वेगळा असेल. Oppo A74 5G व्यतिरिक्त, कंपनी आपल्या A-सीरीजमध्ये 19 एप्रिलला Oppo A54 भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. Flipkart ने Oppo A54 साठी एक माइक्रोसाइट बनवली आहे, ज्यात देशातील लॉन्च डेटचा खुलासा झाला आहे. (Oppo A74 5G India launch date April 19-20 price specifications sale Amazon India)

Oppo A74 5G India launch डिटेल

Amazon वर बनलेल्या Oppo A74 5G च्या प्रोडक्ट पेजवर फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला नाही. तर, भारतात फोन 20 एप्रिलला दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाईल, ज्याची माहिती कंपनीने दिली आहे. तुम्ही कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटवर या फोनचा लाइव लॉन्च बघता येईल.

हे देखील वाचा : 20 एप्रिलला आहे Apple चा मोठा ईवेंट, नवीन iPhone पासून AirPods पर्यंत होऊ शकतात या मोठ्या घोषणा

Oppo A74 5G price in India

Oppo A74 5G या महिन्याच्या सुरुवातीला कंबोडिया आणि थायलंडमध्ये सिंगल 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला गेला होता, ज्याची किंमत जवळपास 21,500 रुपये आहे. पण, कंपनीने ऑफिशियल इनवाइट शेयर करून सांगितले आहे कि फोनची किंमत 20,000 रुपये असेल.

OPPO A74 5G स्पेसिफिकेशन्स

OPPO A74 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाची IPS LCD स्क्रीन दिली जाऊ शकते, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+, आस्पेक्ट रेश्यो 20:9, रिफ्रेश रेट 90Hz आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन लेटेस्ट Android 11 वर आधारित ColorOS 11.1 वर चालतो. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

OPPO A74 5G स्मार्टफोनमधील कॅमेरा सेटअप पाहता यात 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच या फोनमध्ये 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात. सेल्फी कॅमेरा पाहता या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo A74 5G दूसरे मार्केटमध्ये 8 मेगापिक्सल कॅमेरा सेंसरसह सादर केला गेला आहे.

हे देखील वाचा : ASUS ZenFone 8 Mini लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, यात असेल 16GB रॅम

ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 480 चिपसेटसह 6 GB रॅम मिळू शकतो. या फोनमध्ये 128GB स्टोरेज मिळू शकते. यात microSD कार्ड स्लॉट असेल कि नाही हे अजून स्पष्ट झाले नाही. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्ज सपोर्ट दिला जाऊ शकतो. स्पेसिफिकेशन्स बघून वाटत आहे कि OPPO A74 5G स्मार्टफोन चीनमध्ये यावर्षीच्या सुरुवातीला लॉन्च केलेला OPPO A93 5G चा रिब्रँड असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here