Home बातम्या नवीन फोन येताच जुन्या स्मार्टफोनची किंमत घटली; स्वस्त झाला 108MP कॅमेरा आणि 8GB RAM असलेला फोन

नवीन फोन येताच जुन्या स्मार्टफोनची किंमत घटली; स्वस्त झाला 108MP कॅमेरा आणि 8GB RAM असलेला फोन

रियलमीनं आजच भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Realme 9i 5G Phone लाँच केला आहे. यात 6GB RAM, 50MP Camera आणि MediaTek Dimensity 810 5G चिपसेट सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G हँडसेट आहे तर भारतातील स्वस्त 5G स्मार्टफोन्स पैकी एक. नवीन रियलमी 9आय 5जी लाँच करण्यासोबतच कंपनीनं बाजारातील Realme 9 4G Phone च्या किंमतीत कपात देखील केली आहे. कंपनीनं रियलमी 9 4जीच्या सर्व व्हेरिएंट्सची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे.

Realme 9 4G Price in India

रियलमी इंडियानं आपल्या 4G Smartphone Realme 9 च्या किंमतीत थेट 1,000 रुपयांची कपात केली आहे जी फोनच्या सर्व व्हेरिएंट्सवर आजपासूनच लागू होईल आहे. Realme 9 वरील प्राइस कटनंतर आता 17,999 रुपयांमध्ये विकला जाणारा फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट आता 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर रियलमी 9 4जीच्या 8जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची प्राइस 18,999 रुपयांवरून 17,999 रुपये झाली आहे. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त 5G फोन! 6GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Realme 9i 5G ची भारतात एंट्री; इतकी आहे किंमत

Realme 9 4G चे स्पेसिफिकेशन्स

Realme 9 4G कंपनीचा कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन आहे. त्यामुळे कंपनीनं दर्जेदार कॅमेरा सेन्सरचा वापर फोनमध्ये केला आहे. फोनमध्ये 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा Samsung ISOCELL HM6 108MP कॅमेरा लेन्स आहे. प्रायमरी कॅमेऱ्यासह फोनमध्ये सुपर वाइड लेन्स आणि मॅक्रो कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो, जो Sony IMX471 इमेज सेन्सर आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीनं सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग करता येते.

रियलमी 9 4जी फोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट चालतो. ही स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते, ज्याचा वापर फोन अनलॉक करण्यासाठी केला जातो. या फोनचा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्टड आहे. हे देखील वाचा: Motorola चा धमाका! भारतात लाँच केला मोठा डिस्प्ले असलेला स्वस्त टॅबलेट; इतकी आहे किंमत

Realme 9 4G अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर सादर झाला होता. ज्यात ऑक्टा कोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो, ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.