Motorola चा धमाका! भारतात लाँच केला मोठा डिस्प्ले असलेला स्वस्त टॅबलेट; इतकी आहे किंमत

Motorola नं भारतात आपला नवीन अँड्रॉइड टॅबलेट लाँच केला आहे. कंपनीचा लेटेस्ट टॅब भारतीय बाजारात Moto Tab G62 नावानं बजेट सेग्मेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा टॅबलेट मोठ्या डिस्प्लेसह मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. भारतीय बाजारात मोटोरोलाच्या या टॅबची थेट टक्कर Realme Pad, Nokia T20 आणि अन्य टॅबलेटशी होईल, जे 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये सादर करण्यात आले आहेत. मोटोरोलाचा हा टॅब Qualcomm प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला Motorola Moto Tab G62 च्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Moto Tab G62 चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Moto Tab G62 टॅबलेटमध्ये 10.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले पॅनल आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2K आहे. मोटोरोलाचा हा टॅबलेट नियर स्टॉक व्हर्जन Android 12 वर चालतो. या टॅबलेटमध्ये स्पेशल रीडिंग मोड, किड्स मोड आणि एंटरटेनमेंट स्पेस सारखे स्पेशल फीचर्स देण्यात आले आहेत. लेटेस्ट Moto Tab G62 टॅबमध्ये 7,700mAh ची बॅटरी आणि 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर टॅबलेटमध्ये Dolby Atmos सपोर्टेड क्वॉड स्पिकर्स मिळतात. हे देखील वाचा: जे शाओमी-रियलमीला झेपलं नाही ते Oukitel नं केलं; अत्यंत स्वस्तात लाँच केला दगडासारखा मजबूत स्मार्टफोन

मोटोरोलाचा लेटेस्ट Tab G62 क्वॉलकॉमच्या Snapdragon 680 प्रोसेसर आणि 4GB रॅमसह येतो. या टॅबलेटमध्ये 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. कॅमेरा सेन्सर पाहता टॅबलेटच्या फ्रंटला 5MP आणि मागे 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. जोडीला कनेक्टिव्हिटीसाठी या टॅबमध्ये LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.1, GPS, USB-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. हा टॅब ड्युअल टोन डिजाइनसह लाँच करण्यात आला आहे. हे देखील वाचा: सर्वांची सुट्टी करण्यासाठी मोटोरोला सज्ज! किफायतशीर किंमतीत 12GB RAM आणि 144Hz डिस्प्लेसह Moto S30 Pro लाँच

Moto Tab G62 ची किंमत

Moto Tab G62 Wi-Fi-ओनली आणि LTE व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यांची किंमत अनुक्रमे 15,999 रुपये आणि 17,999 रुपये आहे. मोटोरोलाचा हा टॅब ग्रे कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. वाय-फाय ओनली व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध आहे तर LTE मॉडेलची प्री-ऑर्डर सुरु झाली आहे. मोटोरोलाचा टॅब फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here