Home बातम्या Realme 9i च्या एमआरपीवर 5000 रुपयांची ऑफर; फ्लिपकार्टवर सुरु आहे विक्री

Realme 9i च्या एमआरपीवर 5000 रुपयांची ऑफर; फ्लिपकार्टवर सुरु आहे विक्री

बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करणाऱ्या चिनी कंपनी रियलमीनं यंदा जानेवारीमध्ये एक शानदार डिवाइस बाजारात सादर केला होता. 5000mAh ची बॅटरी, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा, सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग, 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले, 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजसह Realme 9i भारतीयांच्या भेटीला आला होता. याची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart च्या माध्यमातून केली जात आहे. विशेष म्हणजे या हँडसेटवर आता 5,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. डिस्काउंटसह फोनवर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय सारखे ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 649 रुपयांमध्ये देखील विकत घेता येईल. चला जाणून घेऊया Realme 9i ची किंमत, ऑफर्स आणि फीचर्सची माहिती.

Realme 9i किंमत आणि ऑफर्स

Realme 9i स्मार्टफोनची फ्लिपकार्टवर एमआरपी 16,999 रुपये आहे. ज्यावर 29 टक्के म्हणजे 5,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या ऑफर नंतर तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 11,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच Realme 9i फोन फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास 5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. ईएमआय ऑप्शन पाहता नो कॉस्ट ईएमआयच्या माध्यमातून तुम्ही हा फोन फक्त 3 आणि 6 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर विकत घेऊ शकता. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन Realme 9i फोनवर 11,350 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. म्हणजे जर तुमच्या जुन्या डिवाइसवर तुम्हाला चांगली किंमत मिळाली तर हा डिवाइस तुम्हाला फक्त 649 रुपयांमध्ये मिळेल. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीचं साम्राज्य धोक्यात! Samsung घेऊन येत आहे सर्वात स्वस्त 5जी फोन, इतकी असेल किंमत

Realme 9i चे स्पेसिफिकेशन्स

Realme 9i स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट मिळते. फोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टाकोर 2.4GHz 6nm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतीला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 5GB अतिरिक्त रॅम मिळवता येतो. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआय 2.0 वर चालतो. हे देखील वाचा: पुन्हा ओटीटीवर दिसणार अभिषेक बच्चनची जादू; ‘Breathe: Into the Shadows’ च्या दुसऱ्या सिझनची रिलीज डेट ठरली, पाहा ट्रेलर

रियलमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP B&W लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड, 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, GPS, Bluetooth v5.0, a 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.