15 हजारांच्या रेंजमध्ये येऊ शकतो Samsung Galaxy A14 5G; लीकमधून माहिती आली समोर

Samsung Galaxy F23 5G
Samsung Galaxy F23 5G

सॅमसंग संबंधित मोठी बातमी समोर येत आहे की कंपनी एक लो बजेट 5जी स्मार्टफोनवर काम करत आहे जो लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो. हा मोबाइल फोन कंपनीच्या गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमध्ये जोडला जाईल जो Samsung Galaxy A14 5G नावानं लाँच केला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी स्मार्टफोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असू शकतो जो 15 हजारांच्या रेंजमध्ये लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे या रेंजमधील रेडमी, रियलमी आणि मोटोरोला स्मार्टफोन्सना नक्कीच टक्कर मिळू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी लीक झालेली किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी कंपनीचा सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन बनू शकतो. किंमत पाहता समोर आलेल्या माहिती व लीक्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी स्मार्टफोन 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ही फोनची बेस किंमत असू शकते जी छोट्या व्हेरिएंटची प्राइस असू शकते. Samsung Galaxy A14 5G ची किंमत 15,000 रुपयांपासून सुरु होऊन 18,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. हे देखील वाचा: पुन्हा ओटीटीवर दिसणार अभिषेक बच्चनची जादू; ‘Breathe: Into the Shadows’ च्या दुसऱ्या सिझनची रिलीज डेट ठरली, पाहा ट्रेलर

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोनबद्दल कंपनीनं आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही परंतु समोर आलेले लीक्स पाहता या मोबाइल फोनमध्ये 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिली जाऊ शकते जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकतो. हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर आधारित वनयुआय 5.0 सह लाँच होऊ शकतो. फोनमध्ये चिपसेट कोणता असेल, याची माहिती मात्र समजली नाही. आता कंपनी स्वतःचा प्रोसेसर वापरेल की क्वॉलकॉमचा सहारा घेईल हे पाहावं लागेल.

Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोन 6 जीबी रॅमवर लाँच केला जाऊ शकतो जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो ज्याचा प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते जी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह काम करू शकते. हे देखील वाचा: बजेट फ्रेंडली Realme 10 Series चा लाँच कन्फर्म! लाँच पूर्वीच लीक झाले स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी च्या भारतीय लाँच बद्दल अजूनतरी कंपनीनं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे समोर आलेली Samsung Galaxy A14 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सकडे सध्या फक्त एका लीकच्या नजरेतून बघता येईल. परंतु सध्या 5G स्मार्टफोन्सची वाढती मागणी पाहता कंपनी लवकरच हा डाव खेळू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here