Realme ने ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात आपले दोन नवीन आणि स्वस्त स्माटफोन Realme C12 आणि Realme C15 लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतात आणि कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यातील एक रियलमी सी15 बद्दल आता बातमी येत आहे कि कंपनी या फोनचा अजून एक नवीन मॉडेल लॉन्च करण्याची योजना बनवत आहे आणि हा फोन Realme C15 Qualcomm Edition नावाने भारतीय बाजारात येईल.
Realme C15 Qualcomm Edition ची माहिती टिप्सटर मुकुल शर्माने दिली आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि रियलमी सी15 स्मार्टफोन कंपनीने मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट वर लॉन्च केला होता. तर नवीन मॉडेलच्या नावावरून समजत आहे कि रियलमी सी15 चा नवीन मॉडेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन चिपसेट वर लॉन्च केला जाईल. लीकनुसार नवीन Realme C15 बाजरात दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, ज्यात 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजचा समावेश असेल. तसेच हा फोन Power Blue आणि Power Silver कलर मध्ये विकत घेता येईल.
Realme C15
रियलमी सी15 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर झाला आहे जो रियलमी वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Realme C15 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड सेंसर, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि एक ब्लॅक अँड वाइट सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी सी15 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : 48MP कॅमेरा आणि शानदार प्रोसेसर सह Realme Q2 आणि Q2 Pro झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत
Realme C15 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. वाय-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोन के बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा डिवायस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी रिवर्स चार्जिंग फीचर सह येते.
किंमत पाहता रियलमी सी15 चा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तर फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनीकडून Realme C15 Qualcomm Edition ची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पण किंमतीचा अंदाज लावला तर या आगामी मॉडेलची पण बेस किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
रियलमी सी15 व्हिडीओ
