5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला Realme C17, हे आहेत टॉप फीचर्स

Realme ने आज भारतात आपल्या Naro 20 सीरीज मध्ये Realme Narzo 20, Realme Narzo 20A आणि Realme Narzo 20 Pro लॉन्च केला आहे. तर दुसरीकडे कंपनीने आपल्या ‘C’ सीरीज मध्ये Realme C17 स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन सर्वात आधी बांग्लादेश मध्ये सादर केला गेला आहे. 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येणारा रियलमी सी17 कंपनीने वेगळ्या वर्चुअल लॉन्च इवेंटच्या माध्यमातून सादर केला आहे. भारतात Realme C17 कधी लॉन्च होईल याची माहिती समोर आली नाही.

डिजाइन

Realme C17 ची डिजाइन पाहता या फोन मध्ये कंपनीने फ्रंटला पंच-होल दिला आहे जो टॉप लेफ्ट कार्नर वर आहे. या पंच-होल मुळे फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत. तसेच डिवाइसच्या बॉटमला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. मागे फोनच्या डावीकडे एल-शेप क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप सोबतच एलईडी फ्लॅश लाइट मिळेल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Realme C17 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट असलेला IPS LCD पॅनल आहे जो 6.5-इंचाच्या HD+ डिस्प्ले सह येतो. फोनचे स्क्रीन रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल आणि 600nits मॅक्सिमम ब्राइटनेस असेल. डिवाइसच्या डिस्प्लेचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90 टक्के आहे. तसेच Realme C17 Realme UI बेस्ड अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल.

फोटोग्राफी पाहता रियलमी सी17 मध्ये फ्रंटला 8-मेगापिक्सल एआई कॅमेरा AI ब्यूटी सपोर्ट आणि पोर्टेट मोड सह येतो. तर मागे क्वाड कॅमेरा सपोर्ट असेल, ज्यात अपर्चर f/1.8 सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर, 119-डिग्री 8-मेगापिक्सल सूपरवाइड लेंस आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो शूटर 4cm फोकस डिस्टेंस आणि 2-मेगापिक्सल B&W पोर्टेट लेंस आहे.

रियली सी17 फोन 11nm स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट वर सादर केला जाईल, ज्याचा क्लॉक स्पीड 1.8GHz असेल. चिपसेट सह Adreno 610 GPU आहे. तसेच फोन 6GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सह येतो. फोनची स्टोरेज वाढवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. कंपनी येत्या काळात डिवाइसचे अजून रॅम आणि स्टोरेज वेरिएंट सादर करू शकते.

स्मार्टफोन 5,000mAh च्या बॅटरी सह येतो जी 34 दिवसांचा स्टॅण्डबाय टाइम, 18.6 तास वीडियो प्लेबॅक, 12.3 तास PUBG गेमिंग आणि 83.4 तास म्यूजिक प्लेबॅक देईल. मोठी बॅटरी USB-C च्या माध्यमातून 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत

Bangladesh मध्ये Realme C17 ची किंमत BDT 15,990 (जवळपास 13,800 रुपये) आहे. तसेच फोन फक्त 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो. फोनची पहिली विक्री 22 सप्टेंबरला केली जाईल. डिवाइस Navy Blue आणि Lake Green कलर ऑप्शन सह येतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here