Realme ने गेल्या आठवड्यातच टेक मार्केटमध्ये आपला लो बजेट स्मार्टफोन Realme C25 लॉन्च केला होता. कंपनीने हा मोबाईल फोन इंडोनेशियन मार्केटमध्ये आणला होता जो 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 6,000एमएएच बॅटरी सारख्या फीचर्ससह येतो. इंटरनॅशनल लॉन्चनंतर भारतीय फॅन्स या फोनची वाट बघत होते जी आता शेवटाला येणार आहे. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी नवीन रियलमी फोनचा इंडिया लॉन्च टीज केला आहे जो Realme C25 नावाने मार्केट मध्ये येऊ शकतो.
Realme C25 चे नाव कंपनीने स्पष्टपणे घेतले नसले तरी बोलले जात आहे कि टीज केलेला फोन रियलमी सी25 नावाने देशात लॉन्च होईल. माधव सेठ यांच्या ट्वीटमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असलेला स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे ज्यात 6,000एमएएच बॅटरी असल्याचे लिहिण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये रियलमीच्या अधिकाऱ्यांनी ‘C’ अक्षराचा वापर केला आहे ज्यामुळे स्पष्ट झाले आहे कि कंपनीचा आगामी फोन या सीरीजमध्ये लॉन्च होईल. आता Realme C25 ची इंडिया लॉन्च डेट समोर येणायची वाट बघितली जात आहे.
Guys, can you C what is hidden in this photo?
RT and reply with your comments. pic.twitter.com/2Ey0n3rYxA
— Madhav108MP (@MadhavSheth1) March 29, 2021
Realme C25
फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, इंडोनेशियामध्ये लॉन्च झालेल्या या फोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिज्योलूशन 720 x 1600 पिक्सल आहे. तर, स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. रियलमीचा हा बजेट फोन अँड्रॉइड 11 ओएस बेस्ड रियलमी युआय 2.0 वर चालतो. तसेच फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G70 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 4 जीबी रॅमसह 64 व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेजला सपोर्ट करतो. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.
हे देखील वाचा : लो बजेटमध्ये आला वीवोचा अजून एक आणि स्वस्त स्मार्टफोन Vivo Y30G, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
फोटोग्राफीसाठी रियलमी सी25 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी, 2 मेगापिक्सल डेप्थ आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आहे. तसेच, व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला 8 मेगापिक्सल सेल्फी सेंसर मिळतो. रियलमी सी25 ला पावर देण्यासाठी 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, माइक्रो यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक आहे.
Realme C25 जर या स्पेसिफिकेशन्ससह भारतात लॉन्च झाला तर फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी पासून सुरु होईल. तसेच माधव सेठ यांनी हा फोन टीज केल्यामुळे असे बोलले जात आहे कि हा डिवायस येत्या काही दिवसांत भारतात लॉन्च होईल.
