लो बजेटमध्ये आला वीवोचा अजून एक आणि स्वस्त स्मार्टफोन Vivo Y30G, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Vivo ने गेल्या आठवड्यातच आपले शक्तिप्रदर्शन करत ‘एक्स60 सीरीज’ सादर केली होती जिच्याअंतर्गत तीन नवीन स्मार्टफोन Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro Plus लॉन्च केले गेले होते. हे पावरफुल मोबाईल फोन्स सादर केल्यानंतर आता कंपनीने लो बजेटमध्ये आपला नवीन प्रोडक्ट आणला आहे. कंपनीने Vivo Y30G स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो सध्या चीनी मार्केटमध्ये आला आहे. 8 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरीसह येणारा हा मोबाईल फोन येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये येऊ शकतो. (Vivo Y30G officially launched feature specs price sale)

लुक व डिजाईन

Vivo Y30G कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर लॉन्च केला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. वीवो वाय30जी च्या या कॅमेरा सेटअपमध्ये सेंसर्स वर्टिकली लागले आहेत तर सर्वात खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. रियर पॅनलवर खाली Vivo ची ब्रँडिंग आहे आणि फोनच्या राईट पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Vivo Y30G 20:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च केला गेला आहे जो 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन अँड्रॉइड 11 वर सादर केला आहे ओरिजनओएस 1.0 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी वीवो वाय30जी मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर आणि मीडियाटेकचा हीलियो पी65 चिपसेट आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ने केली कमाल, लॉन्च केला सर्वात पातळ 5G फोन Xiaomi Mi 11 Lite, किंमत पण आहे कमी

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय30जी डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकंडरी लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo Y30G एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी वीवो वाय30जी मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

वेरिएंट व प्राइस

Vivo Y30G स्मार्टफोन चीनमध्ये 8 जीबी रॅमसह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या वेरिएंटची किंमत 1499 युआन म्हणजे भारतीय करंसीनुसार 16,000 रुपयांच्या आसपास आहे. चीनी बाजारात हा फोन Aqua Blue, Dawn White आणि Obsidian Black कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here