रियलमीने गेल्या महिन्यात ग्लोबल आणि भारतीय बाजारात Realme GT 6 स्मार्टफोनला लाँच केले होते. तसेच, आता आणि पण पावरफुल स्पेसिफिकेशनसह हा डिव्हाईस होम मार्केट चीनमध्ये सादर झाला आहे. यात युजर्सना ग्लोबल मॉडेलपेक्षा स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट, 16 जीबी रॅम, 1 टीबी पर्यंत स्टोरेज, 6.78 इंचाचा डिस्प्ले, 5800mAh बॅटरी सारखे अनेक फिचर्स दिले जात आहेत. चला, पुढे किंमत आणि सर्व वैशिष्ट्ये सविस्तर जाणून घेऊया.
Realme GT 6 चे स्पेसिफिकेशन (चीन)
6.78 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले
स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट
16GB RAM+1TB स्टोरेज
50MP ड्युअल रिअर कॅमेरा
16MP सेल्फी कॅमेरा
5800mAh बॅटरी
120W SuperVOOC चार्जिंग
IP65 रेटिंग
- डिस्प्ले: Realme GT 6 च्या चायना मॉडेलमध्ये 6.78-इंचाचा 8T LTPO अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 2780×1264 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 6000 निट्स पर्यंतच्या अधिकतम ब्राईटनेस, 100% DCI-P3 कलर गॅमट, 3+1 प्लस लो-फ्रीक्वेंसी फ्लिकर DC डिमिंग, 2160Hz हाय-फ्रीक्वेंसी PWM डिमिंगला सपोर्ट मिळत आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी क्रिस्टल आर्मर ग्लास प्रोटेक्शन लावण्यात आली आहे.
- चिपसेट: हा मोबाईल इंडिया मॉडेलच्या स्पर्धेत ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटसह लाँच झाला आहे. हा 4 नॅनोमीटर प्रक्रियावर आधारित आहे. यात एड्रेनो 750 GPU मिळतो.
- स्टोरेज आणि रॅम: स्मार्टफोनमध्ये 12GB, 16GB LPDDR5X RAM सह 256GB, 512GB, 1TB पर्यंत UFS 4.0 इंटरनल स्टोरेज आहे.
- कॅमेरा: Realme GT 6 मोबाईलमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात OIS सह 50MP चा Sony IMX890 सेन्सर आणि 8MP चा IMX355 अल्ट्रा-वाईड कॅमेरा लावला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी सॅमसंग S5K3P9 सेन्सरसह 16MP ची लेन्स आहे.
- बॅटरी: Realme GT 6 स्मार्टफोन चीनमध्ये 120W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 5800mAh मोठ्या बॅटरीसह सादर झाला आहे.
- इतर: Realme GT 6 स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, धूळ आणि पाण्यापासून वाचणारी IP65 रेटिंग, स्टीरियो स्पिकर, डॉल्बी एटमॉस, हाय-रेज ऑडियो, 5G, 4G VoLTE, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4 सारखे अनेक फिचर्स आहेत.
- ऑपरेटिंग सिस्टम: हा रियलमी फ्लॅगशिप मोबाईल Android 14 आधारित रियलमी UI 5 वर आधारित ठेवला गेला आहे.
Realme GT 6 ची किंमत (चीन)
Realme GT 6 चार मेमरी व्हेरिएंटमध्ये चीनमध्ये लाँच झाला आहे. याला Purple, White आणि Black सारख्या तीन रंगामध्ये विकत घेता येईल. तसेच, किंमतीची माहिती तुम्ही खाली टेबल मध्ये पाहू शकता.
| मेमरी व्हेरिएट | चीन किंमत | भारतीय किंमत |
| 12GB + 256GB | 2,799 युआन | जवळपास 32,000 रुपये |
| 16GB + 256GB | 3,099 युआन | जवळपास 35,570 रुपये |
| 16GB + 512GB | 3,399 युआन | जवळपास 39,000 रुपये |
| 16GB + 1TB | 3,899 युआन | जवळपास 44,700 रुपये |
