रियलमीने आज आपला नवीन स्मार्टफोन Realme GT Neo लॉन्च केला आहे. फोन कंपनीने सर्वप्रथम चीनच्या मार्केटमध्ये अधिकृतपणे सादर केला आहे. आशा आहे कि हा भारतीय बाजारात पण लवकरच सादर केला जाऊ शकतो. पण अजूनतरी अधिकृतपणे याची माहिती समोर आली नाही. असे बोलले जात आहे कि कंपनी याबाबत लवकरच खुलासा करू शकते. विशेष म्हणजे या फोनच्या आधी कंपनीने Realme GT 5G सादर केला आहे. (realme gt neo 5g launch with mediatek dimensity 1200 soc 65w fast charging)
Realme GT Neo मध्ये आहे मीडियाटेक डाइमेंशन 1200 SoC
Realme GT Neo मीडियाटेक डाइमेंशन 1200 चिपसेटवर सादर केला गेला आहे, ज्याची माहिती टीजर इमेज मधेच समोर आली होती. मीडियाटेक डाइमेंशन 1200 SoC जानेवारीमध्ये हाई-एन्ड 5G चिपसेट म्हणून लॉन्च केला गेला होता. मीडियाटेक डाइमेंशन 1200 एक ऑक्टा-कोर SoC आहे जो ARM Cortex-A78 अल्ट्रा कोरची सुविधा देतो, जो 2X L2 कॅशसह 3GHz पर्यंत जातो. बोलले जात आहे कि या चिपसेट सह Redmi आपला गेमिंग स्मार्टफोन आणि दुसरा वनप्लस नॉर्ड 2 पण मीडियाटेक डाइमेंशन 1200 SoC सह सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा : Samsung चा नवीन 5G फोन Galaxy S20 FE भारतात झाला लॉन्च, यात आहे पावरफुल प्रोसेसर
Realme GT Neo चा कॅमेरा
Realme GT Neo मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये f / 1.8 अपर्चरसह 64-मेगापिक्सल Sony IMX682 प्राइमरी सेंसर, f/2.3 अपर्चर, 119-डिग्री FoV असलेली अल्ट्रा-वाइड अँगल लेंस सह 8-मेगापिक्सल सेंसर आहे. तसेच फोनमध्ये f / 2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटर. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी f / 2.5 अपर्चरसह 16-मेगापिक्सलचा सेंसर आहे.
Realme GT Neo चे स्पेसिफिकेशन्स
यात 6.43-इंचाचा सॅमसंग सुपर AMOLED फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 360 हर्ट्ज सॅंपल रेटिंग रेटसह येतो. तसेच फोनच्या डिस्प्लेमध्ये 91.7 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो आहे. फोन 12GB रॅम आणि 256GB पर्यंतच्या UFS 3.1 स्टोरेजसह येतो.
डुअल-सिम (नॅनो) सह येणारा Realme GT Neo रियलीमी UI 2.0 वर आधारित अँड्रॉइड 11 वर चालतो. तसेच Realme GT Neo डुअल-मोड 5G, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे ऑप्शन आहेत.
Realme ने Realme GT Neo मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी आहे जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनमध्ये डुअल स्टीरियो स्पीकर, डुअल-माइक नॉइज रिडक्शन, डॉल्बी ऑडियो आणि हाय-रेस ऑडियो सर्टिफिकेशन पण आहे. याचा आकार 158.5×73.3×8.4 मिमी आहे आणि याचे वजन 179 ग्राम आहे.
किंमत
Realme GT Neo च्या 6GB + 128GB ची किंमत CNY 1,799 (जवळपास 20,100 रुपये), 8GB + 128G ची किंमत CNY 1,999 (जवळपास 22,400 रुपये) आणि 12GB + 256GB ची किंमत CNY 2,399 (जवळपास 26,800 रुपये) आहे. Realme GT Neo कंपनीने Final Fantasy, Geek Silver आणि Hacker Black कलरमध्ये सादर केला आहे.
हे देखील वाचा : उद्यापासून मोबाईल विकत घेणे होईल महाग, जाणून घ्या किती करावा लागेल खिसा रिकामा
फोनच्या इंडिया लॉन्चबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. पण, फोन भारतातील IMEI डेटाबेस आणि ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) च्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर कथितरित्या दिसला आहे, त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि भारतात फोन लवकरच येईल.
