पुढल्या महिन्यात म्हणजे 1 एप्रिलपासून खूप काही महाग होणार आहे. एक एप्रिलपासून वाहनांपासून मोबाईलपर्यंत अनेक गोष्टींचे दर वाढू शकतात. कारण केंद्रीय वित्त मंत्री सीतारमण यांनी बजेटमध्ये घोषणा केली होती कि इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टवर 2.5 टक्के इंपोर्ट ड्यूटी वाढवली जाईल, ज्यात मोबाईलसमवेत फोनच्या अॅक्सेससरीजसाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. इंपोर्ट ड्यूटी सध्या 7.5 टक्के आहे पण एक एप्रिलपासून हि 10 टक्के होईल. असे जरी असले तरी अजूनतरी कोणत्याही कंपनीने आपल्या फोन्सचे दर वाढवल्याची घोषणा केली नाही. पण, आशा आहे कि कंपन्या लवकरच याची घोषणा करू शकतात. (mobile will be expensive from april 1 import duty will be increased)
गेल्यावर्षी पण झाली होती वाढ
गेल्यावर्षी GST वाढल्यानंतर सर्व स्मार्टफोन कंपन्यांनी भारतात आपल्या फोन्सचे दर वाढवले होते. इंपोर्ट ड्यूटी वाढल्यानंतर स्मार्टफोन व्यतिरिक्त दुसऱ्या गॅजेट्ससाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागू शकतात.
हे देखील वाचा : Samsung चा नवीन 5G फोन Galaxy S20 FE भारतात झाला लॉन्च, यात आहे पावरफुल प्रोसेसर
इंडस्ट्रीमध्ये तणाव
मोबाईल इंडस्ट्री एक्स्पर्ट्स म्हणतात कि इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टवर 2.5 टक्के इंपोर्ट ड्यूटी वाढवल्यामुळे स्मार्टफोन मार्केटवर खूप परिणाम होईल, त्यामुळे मोबाईल फोनच्या किंमती वाढू शकतात. याचा थेट परिणाम मोबाईल ग्राहकांच्या खिशावर पडेल. इंपोर्ट ड्यूटी वाढवल्यानंतर मोबाईल फोन निर्माता कंपन्यांना नाईलाजाने किंमती वाढवाव्या लागतील.
महाग होतील मोबाईल
इंपोर्ट ड्यूटी वाढवल्यानंतर सर्वात जास्त परिणाम प्रीमियम स्मार्टफोनवर होईल. बोलले जात आहे कि स्वस्त आणि बजेट रेंज मोबाईलच्या किंमतीत जास्त फरक दिसणार नाही. तसेच, काही लोकांच्या मते कोरोना काळात हे मोबाईल कंपन्यांसमोर मोठे आव्हानपूर्ण असेल.
टीव्ही पण होतील महाग
1 एप्रिल 2021 पासून मोबाईल फोनव्यतिरिक्त टीव्हीच्या किंमतीपण वाढतील. गेल्या काही महिन्यांपासून सतत टीव्हीचे दर वाढत आहेत. 1 एप्रिल 2021 पासून टेलीविजनच्या किंमती जवळपास 3000 रुपयांपर्यंत वाढू शकतात. तुमच्या लक्षात असेल कि चीनमधून होणाऱ्या आयातीवर बंदी घातल्यानंतर टीव्हीच्या किंमती पण वाढल्या होत्या.















