Home बातम्या Realme Narzo 60 5G सीरीज भारतात लाँच, पहिल्यांदाच मिळेल 24GB पर्यंत रॅमची ताकद

Realme Narzo 60 5G सीरीज भारतात लाँच, पहिल्यांदाच मिळेल 24GB पर्यंत रॅमची ताकद

Highlights
  • फोन्समध्ये Martial Horizon डिजाइन देण्यात आली आहे.
  • नारजो 60 सीरीजमध्ये हाय क्वॉलिटी वेगन लेदर फिनिश आहे.
  • ह्यांची विक्री ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर सुरु होईल.

Realme नं भारतीय बाजारात आपली नवीन नारजो 60 सीरीज 5G सादर केली आहे. ह्यात Realme Narzo 60 5G आणि Realme Narzo 60 Pro 5G डिवाइस लाँच करण्यात आले आहेत. ह्या फोन्समध्ये मोठा कर्व्ड डिस्प्ले, व्हर्च्युअल रॅमसह भारतात पहिल्यांदाच 24GB पर्यंत रॅम सपोर्ट, 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज आणि अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

Realme Narzo 60 सीरीजची किंमत

कंपनीनं Realme Narzo 60 दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आला आहे. ज्यात 8GB रॅम +128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8जीबी रॅम +256जीबी स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांचा आहे.

Realme Narzo 60 Pro स्मार्टफोन तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे ज्यात 8GB रॅम +128GB स्टोरेज 23,999 रुपयांचा आहे. फोनचा 12GB रॅम +256GB व्हेरिएंट 26,999 रुपयांमध्ये मिळेल. तर सर्वात मोठा मॉडेल 12GB रॅम +1TB स्टोरेजसह 29,999 रुपयांना मिळेल.

दोन्ही मोबाइलची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर 15 जुलैपासून सुरु होईल. फोनवर कंपनी डिस्काउंट ऑफर देखील घेऊन त्यामुळे प्रो मॉडेल वर 1,500 रुपयांचा डिस्काउंट आयसीआयसीआय बँक कार्ड आणि एसबीआय कार्डच्या मदतीनं दिला जाईल.

Realme Narzo 60 सीरीजची डिजाइन

रियलमीनं ह्या सीरीजच्या फोन्समध्ये Martial Horizon डिजाइन सादर केली आहे. बॅक पॅनलवर हाय क्वॉलिटी वेगन लेदर फिनिश देण्यात आली आहे. जी स्टेन रेसिस्टेंट आणि स्वच्छ करण्यास सोपी आहे. मागे मोठा कॅमेरा मॉड्यूल देखील आहे जो गोलाकार आहे. ज्यात एलईडी फ्लॅश आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फ्रंट पाहता फोन्समध्ये कर्व डिस्प्ले मिळतो. डिस्प्लेच्या मध्यभागी पंच होल देण्यात आला आहे. जिथे सेल्फी कॅमेरा आहे.

Realme Narzo 60 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 60 5G चे स्पेसिफिकेशन्स