
Realme नं भारतीय बाजारात आपली नवीन नारजो 60 सीरीज 5G सादर केली आहे. ह्यात Realme Narzo 60 5G आणि Realme Narzo 60 Pro 5G डिवाइस लाँच करण्यात आले आहेत. ह्या फोन्समध्ये मोठा कर्व्ड डिस्प्ले, व्हर्च्युअल रॅमसह भारतात पहिल्यांदाच 24GB पर्यंत रॅम सपोर्ट, 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज आणि अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
Realme Narzo 60 सीरीजची किंमत
कंपनीनं Realme Narzo 60 दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आला आहे. ज्यात 8GB रॅम +128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8जीबी रॅम +256जीबी स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांचा आहे.
Realme Narzo 60 Pro स्मार्टफोन तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे ज्यात 8GB रॅम +128GB स्टोरेज 23,999 रुपयांचा आहे. फोनचा 12GB रॅम +256GB व्हेरिएंट 26,999 रुपयांमध्ये मिळेल. तर सर्वात मोठा मॉडेल 12GB रॅम +1TB स्टोरेजसह 29,999 रुपयांना मिळेल.
दोन्ही मोबाइलची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर 15 जुलैपासून सुरु होईल. फोनवर कंपनी डिस्काउंट ऑफर देखील घेऊन त्यामुळे प्रो मॉडेल वर 1,500 रुपयांचा डिस्काउंट आयसीआयसीआय बँक कार्ड आणि एसबीआय कार्डच्या मदतीनं दिला जाईल.
Realme Narzo 60 सीरीजची डिजाइन
रियलमीनं ह्या सीरीजच्या फोन्समध्ये Martial Horizon डिजाइन सादर केली आहे. बॅक पॅनलवर हाय क्वॉलिटी वेगन लेदर फिनिश देण्यात आली आहे. जी स्टेन रेसिस्टेंट आणि स्वच्छ करण्यास सोपी आहे. मागे मोठा कॅमेरा मॉड्यूल देखील आहे जो गोलाकार आहे. ज्यात एलईडी फ्लॅश आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फ्रंट पाहता फोन्समध्ये कर्व डिस्प्ले मिळतो. डिस्प्लेच्या मध्यभागी पंच होल देण्यात आला आहे. जिथे सेल्फी कॅमेरा आहे.
Realme Narzo 60 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले : Realme Narzo 60 Pro 5G मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ कर्व अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेवर पंच-होल डिजाइन मिळते. ह्या पॅनलवर 120Hz रिफ्रेश रेट आणि 2160Hz PWM फ्रीक्वेंसी सपोर्ट आहे.
- प्रोसेसर : Narzo 60 Pro 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. जो 2.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी ह्या फोनमध्ये एआरएम माली-जी68 जीपीयू आहे.
- स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइस 12gbGB +1TB पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच व्हर्च्युअल रॅम सपोर्टच्या मदतीनं 12GB एक्स्ट्रा रॅम वाढवता येतो. म्हणजे युजर्सना एकूण मिलाकर 24 जीबी पर्यंत रॅम सपोर्ट मिळेल.
- बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या रियलमी मोबाइलमध्ये 5,000एमएएच बॅटरी, 67W SuperVOOC चार्जिंग देण्यात आली आहे.
- कॅमेरा : ह्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 100 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स OIS सपोर्टसह मिळतो तसेच ह्या लेन्ससह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा आणखी एक सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Realme Narzo 60 5G चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले : Realme Narzo 60 5G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेवर पंच-होल डिजाइन आहे. ह्या पॅनलवर 90Hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन सपोर्ट मिळतो. सुरक्षेसाठी इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर देखील आहे.
- प्रोसेसर : डिवाइसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 प्रोसेसर देण्यात आला आहे.
- बॅटरी : ह्यात 5,000एमएएच बॅटरी, 33W SuperVOOC चार्जिंग देण्यात आली आहे.
- कॅमेरा : फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
- ओएस : हा मोबाइल देखील अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो.















