Home बातम्या 7 जुलैला भारतात येतील realme narzo 60 5G आणि narzo 60 Pro 5G फोन, अशी असेल खासियत

7 जुलैला भारतात येतील realme narzo 60 5G आणि narzo 60 Pro 5G फोन, अशी असेल खासियत

realme-narzo-60-pro-5g-and-realme-narzo-60-5g-launching-in-india-on-6-july

रियलमीनं जेव्हा पहिल्यांदा घोषणा केली होती की कंपनी भारतात आपली नवीन ‘नारजो 60’ सीरीज घेऊन येत आहे तेव्हापासून मोबाइल युजर्स आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच आज कंपनीनं फोन लाँच डेटवरील पडदा हटवला आहे आणि सांगितलं आहे की येत्या 6 जुलैला realme narzo 60 5G आणि realme narzo 60 Pro 5G भारतात सादर केले जातील.

नारजो 60 इंडिया लाँच डिटेल

रियलमी इंडियानं सांगितलं आहे की ते 6 जुलैला आपली नवी नारजो 60 सीरीज भारतीय बाजारात घेऊन येतील. हा लाँच इव्हेंट 6 जुलैच्या दुपारी 12 वाजता सुरु होईल ज्याचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर देखील केलं जाईल. रिलीज डेटच्या घोषणेसह रियलमीनं असं देखील सांगितलं आहे की सीरीजमध्ये realme narzo 60 5G आणि narzo 60 Pro 5G लाँच होतील.

नारजो 60 सीरीज डिजाईन

रियलमीनं ट्वीटच्या माध्यमातून आगामी सीरीजच्या स्मार्टफोनचे फोटो देखील शेयर केले आहेत. कंपनीनं फोनच्या लुकला ‘Martian Horizon’ डिजाईन असं नाव दिलं आहे. फोनचा बॅक पॅनल बऱ्याच अंशी रियलमी 11 प्रो स्मार्टफोन सारखा दिसत आहे. ह्यात राउंड शेप रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात तीन कॅमेरा सेन्सर आणि एलईडी फ्लॅश मिळतो.

नारजो 60 5जी प्रो स्मार्टफोनचा बॅक पॅनल लेदर फिनिश असलेला दिसत आहे ज्याच्या कडा कर्व्ड स्टाईल असलेल्या आहेत. इथे पॅनलवर खालच्या बाजूला Narzo ची ब्रँडिग देण्यात आली आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन दिसत आहे.

रियलमी नारजो 60 प्रो 5जी स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)