realme-narzo-60-pro-5g-and-realme-narzo-60-5g-launching-in-india-on-6-july
रियलमीनं जेव्हा पहिल्यांदा घोषणा केली होती की कंपनी भारतात आपली नवीन ‘नारजो 60’ सीरीज घेऊन येत आहे तेव्हापासून मोबाइल युजर्स आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच आज कंपनीनं फोन लाँच डेटवरील पडदा हटवला आहे आणि सांगितलं आहे की येत्या 6 जुलैला realme narzo 60 5G आणि realme narzo 60 Pro 5G भारतात सादर केले जातील.
नारजो 60 इंडिया लाँच डिटेल
रियलमी इंडियानं सांगितलं आहे की ते 6 जुलैला आपली नवी नारजो 60 सीरीज भारतीय बाजारात घेऊन येतील. हा लाँच इव्हेंट 6 जुलैच्या दुपारी 12 वाजता सुरु होईल ज्याचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह शॉपिंग साइट अॅमेझॉनवर देखील केलं जाईल. रिलीज डेटच्या घोषणेसह रियलमीनं असं देखील सांगितलं आहे की सीरीजमध्ये realme narzo 60 5G आणि narzo 60 Pro 5G लाँच होतील.
नारजो 60 सीरीज डिजाईन
रियलमीनं ट्वीटच्या माध्यमातून आगामी सीरीजच्या स्मार्टफोनचे फोटो देखील शेयर केले आहेत. कंपनीनं फोनच्या लुकला ‘Martian Horizon’ डिजाईन असं नाव दिलं आहे. फोनचा बॅक पॅनल बऱ्याच अंशी रियलमी 11 प्रो स्मार्टफोन सारखा दिसत आहे. ह्यात राउंड शेप रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात तीन कॅमेरा सेन्सर आणि एलईडी फ्लॅश मिळतो.
नारजो 60 5जी प्रो स्मार्टफोनचा बॅक पॅनल लेदर फिनिश असलेला दिसत आहे ज्याच्या कडा कर्व्ड स्टाईल असलेल्या आहेत. इथे पॅनलवर खालच्या बाजूला Narzo ची ब्रँडिग देण्यात आली आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन दिसत आहे.
रियलमी नारजो 60 प्रो 5जी स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)
- 6.4″ FHD+ 90Hz Display
- MediaTek Dimensity 920
- 12GB RAM + 256GB Storage
- 48MP Triple Rear Camera
- 67W 5,000mAh Battery
- स्क्रीन : ह्या स्मार्टफोनमध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही पंच-होल स्टाईल अॅमोलेड स्क्रीन असू शकते जिच्यावर 90हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे.
- प्रोसेसर : Narzo 60 Pro 5G मध्ये 6एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डायमेन्सिटी 920 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो जो 2.5गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालेल. ग्राफिक्ससाठी ह्या फोनमध्ये एआरएम माली-जी68 जीपीयू मिळू शकतो.
- मेमरी : रियलमी नारजो 60 प्रो 5जी फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजीसह बाजारात येऊ शकतो. ह्यात वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह 12जीबी पर्यंतच्या फिजिकल रॅम आणि 256जीबी पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.
- ओएस : हा मोबाइल अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम आधारित रियलमी युआय 4.0 सह बाजारात येऊ शकतो.
- कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर मिळू शकतो.
- फास्ट चार्जिंग : रियलमी नारजो 60 प्रो 5जी कंपनी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर करू शकते जी मोठ्या बॅटरीला वेगानं चार्ज करू शकेल.
- बॅटरी : अशाप्रकारे पावर बॅकअपसाठी ह्या रियलमी मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी मिळू शकते.
- इतर फीचर्स : फोनमध्ये 3.5एमएम जॅक, एनएफसी, आयपी रेटिंगसह यूएसबी टाईप-सी, ब्लूटूथ आणि वाय-फाय सारखे फीचर्स मिळू शकतात.














