realme P1 5G फोनचा नवीन आणि परवडणारा व्हेरिएंट झाला भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

रियलमीने काही दिवसांपूर्वी भारतात आपला बाजार वाढवत नवीन ‘P series‘ ची सुरुवात केली आहे. कंपनीकडून दोन मोबाईल फोन realme P1 5G आणि realme P1 Pro 5G भारतात लाँच केले गेले आहेत. यामधील एक रियलमी पी1 चा आता अजून एक नवीन मेमरी व्हेरिएंट बाजारात आणला आहे जो ग्राहकांना एक एक्स्ट्रा व परवडणारा ऑप्शन प्रदान करेल.

रियलमी पी1 5जी फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सादर केला गेला होता ज्यामध्ये 6GB RAM + 128GB Storage तसेच 8GB RAM + 256GB Storage देण्यात आली होती. तसेच आता कंपनीकडून याचा नवीन 8GB RAM + 128GB Storage व्हेरिएंट पण बाजारात आणण्यात आला आहे. हे तिन्ही व्हेरिएंट्स 20 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये विकत घेता येतील ज्याची किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

realme P1 5G ची किंमत

रियलमी पी 1 5 जी फोनच्या 6 जीबी रॅम असणाऱ्या बेस व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. फोनचा नवीन 8 जीबी+128 जीबी व्हेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तसेच realme P1 5G ची सर्वात मोठा 8 जीबी+256 जीबी व्हेरिएंट 18,999 रुपयांमध्ये आणला गेला आहे. म्हणजे जर तुम्ही हा फोन 8GB RAM मध्ये खरेदी करणार आहात तर, आता यासाठी 2,000 रुपये कमी खर्च करावे लागतील. हा स्मार्टफोन कंपनी वेबसाईट तसेच ​शॉपिंग साईट फ्लिपकार्टवरवरून Phoenix Red आणि Peacock Green कलरमध्ये विकत घेतला जाऊ शकतो.

realme P1 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.7″ 120 हर्ट्झ कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • मीडियाटेक डाईमेंसिटी 7050
  • 8 जीबी डायनॅमिक रॅम
  • 16 एमपी सेल्फी कॅमेरा
  • 50 एमपी रिअर कॅमेरा
  • 45 वॉट 5,000 एमएएचची बॅटरी

स्क्रीन : रियलमी पी 1 5 जी फोनमध्ये फ्लॅट स्क्रीन देण्यात आली आहे. हा मोबाईल 2412 X 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे जी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे. यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट व 600 निट्स ब्राईटनेससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळतो.

प्रोसेसर : रियलमी पी 1 मीडियाटेक डाइमेंसिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच झाला आहे. हा 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मोबाईल चिपसेट आहे जो 2.6 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी 68 जीपीयू आहे.

मेमरी : realme P1 5G फोन RAM UFS3.1 + LPDDR4X Storage टेक्नॉलॉजीवर चालतो. हा मोबाईल 8 जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो जो फोनच्या फिजिकल रॅमसह मिळून याला 16 जीबी पर्यंत वाढवतो. या फोनमध्ये 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज मिळते ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

ओएस : रियलमी पी1 5 जी स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो रियलमी युआय 5.0 सह मिळून चालतो. कंपनी आपल्या या फोनला 4 जेनरेशन Android Software update तसेच 3 वर्षाच्या security update सह घेऊन आली आहे.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी रियलमी पी 1 ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल सोनी एलवायटी 600 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर वाले 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह चालतो. तसेच सेल्फी काढणे आणि रिल्स बनविण्यासाठी या फोनमध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी : realme P1 5G फोन 45 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 28 मिनिटामध्ये 0 ते 50% चार्ज तसेच 65 मिनिटामध्ये 100 टक्के फुल चार्ज होऊ शकते. या फोनमध्ये OTG reverse charging पण मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here