Realme लवकरच आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये Q- सीरीजचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. लीक रिपोर्टनुसार हा फोन 13 ऑक्टोबरला सादर केला जाईल. कंपनीने फोनची लॉन्च डेट बद्दल काही सांगितले नाही. पण Realme चे सीएमओ, जू क्यूई चेसने वीबो वर एका पोस्टच्या माध्यमातून घोषणा केली आहे कि ब्रँड लवकरच क्यू-सीरीज अंतगर्त एक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, सोबत फोनचा फोटो पण दाखवण्यात आला आहे. तसेच एका लोकप्रिय टिपस्टरने Realme Q2 स्मार्टफोनबाबत काही स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.
Realme Q फोन काही दिवसांपूर्वी चीनच्या 3C रेगुलेटरी वेबसाइट वर लिस्ट केला गेला होता. जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर समोर आलेल्या रियली क्यू2 प्रो ची डिजाइन पाहता फोन यूनिक वाइट लेदर फिनिश आणि मागे “Dare to Leap” टॅगलाइन सह दाखवण्यात आला आहे.
डिजाइन
फोटज मध्ये Realme Q2 खूप प्रीमियम फोन वाटत आहे. Realme VP नुसार कंपनीने आगामी Realme Q2 सिरीज वर “हाईएंड प्लेन लेदर क्राफ्टमनशिप” चा वापर केला आहे. चेसने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे, ‘नवीन हलक्या ग्रे रंगाच्या चामड्याचा रंग, हाईएंड टेक्सचर आणि फील प्रिंट सह’ डेयर टू लेप ‘, अगदी लग्जरी वाटतो.
मागे कॅमेरा सेटअप आयताकृती आकारात दिसत आहे. तसेच फोन मध्ये कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाह, त्यामुळे वाटत आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असेल.
स्पेसिफिकेशन्स
टिपस्टर कडून समजले आहे कि Realme Q2 मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करू शकतो. फोन 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह येईल, जो पंच-होल डिजाइन मध्ये असेल. तसेच Realme Q2 मध्ये 48MP + 8MP + 2MP कॉन्फिगरेशन सह ट्रिपल-कॅमेरा सेटअप असू शकतो. फोन 5,000mAh च्या बॅटरी सह येऊ शकतो. फोन 9.1mm जाड आणि वजन 194 ग्राम असू शकते. टिपस्टरने पुढे दावा केला आहे कि दोन्ही हँडसेट मीडियाटेक डाइमेंशन 800U प्लॅटफॉर्म सह येऊ शकतात. Q2 Pro मध्ये 16MP चा सेल्फी शूटर आणि 48MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप पण असेल. डिवाइस 65W फास्ट चार्जिंग सह येऊ शकतो.














