भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये सर्वात वेगाने आपला बिजनेस वाढवत असलेली स्मार्टफोन कंपनी Realme लवकरच लो बजेट कॅटेगरी मध्ये 5G स्मार्टफोन सादर करण्याची योजना बनवत आहे. या सेग्मेंट मध्ये कंपनी वनप्लस आणि मोटोरोला सारख्या कंपन्यांच्या फोन्सना आव्हान देईल. समोर आलेल्या एका नवीन माहिती मध्ये सांगण्यात आले आहे कि रियलमीच्या अपकमिंग 5जी फोनची किंमत खूप कमी होईल. तसेच, किंमत कमी झाल्यानंतर पण फोन मध्ये पावरफुल बॅटरी आणि दमदार फीचर्स दिले जातील. काही दिवसांपूर्वी 3C सर्टिफिकेशन साइटवर हा नवीन फोन मॉडेल नंबर RMX3121 आणि RMX3122 सह स्पॉट केला गेला होता. तर, आता डिवाइस सर्टिफिकेशन ऑथोरिटी टेना वर दिसला आहे, जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि रेंडर पण समोर आले आहेत.
लो बजेट असलेला 5G फोन
लिस्टिंग मध्ये अशी माहिती देण्यात आली आहे कि Realme RMX3121 एक अफोर्डेबल 5G-रेडी फोन असेल जो ट्रिपल कॅमेरा, 6.52-इंच डिस्प्ले आणि अँड्रॉइड 11 OS ( Realme UI custom skin) सह येईल.
हे देखील वाचा : 8GB रॅमसह गुगलवर दिसला Vivo चा नवीन 5G फोन वीवो S7t, लवकरच येईल बाजारात
किती असेल किंमत
सध्या कंपनीचा Realme Q2i सर्वात स्वस्त 5जी फोन आहे, ज्याची किंमत RMB 999 (जवळपास 11,300) रुपये आहे. आशा आहे कि कंपनी नवीन 5जी फोन सर्वप्रथम आपल्या घरच्या मार्केट मध्ये सादर करू शकते. फोनच्या किंमतीबद्दल अंदाज लावायचा झाल्यास याची किंमत 10,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
डिजाइन
टेनावर समोर आलेल्या फोटोनुसार फोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच फ्रंटला दिला जाईल, ज्यात सेल्फी कॅमेरा असेल. तसेच मागे आयताकृती कॅमेरा दिला जाईल. रेंडर पाहून असे वाटत आहे कि फोन मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेसंर पण असेल.
हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी सेग्मेंट मध्ये Samsung चा पुढचा डाव तयार, 2 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त मोठा डिस्प्ले असलेला Galaxy M02
फीचर्स
याव्यतिरिक्त Realme RMX3121 चा आकार 163.9 x 75.7 x 8.4mm आणि यात पावर बॅकअपसाठी 4,890mAh (मार्केट मध्ये 5,000mAh) बॅटरी असू शकते. त्याचबरोबर फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेंसर मिळू शकतो. पण सध्या सेंसरची माहिती समोर आली नाही.
फोनच्या 3 सी लिस्टिंगवरून समजले होते कि हा 18W फास्ट-चार्जिंग सपोर्ट सह येईल. रॅम आणि स्टोरेज मध्ये फरक असलेला RMX3122 एकच फोन असू शकतो. दुर्दैवाने TENAA लिस्टिंग आणि इंटरनेटवर फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही.
हे देखील वाचा : Redmi Note 10 सीरीजच्या इंडिया लॉन्चच्या आधी समोर आली महत्वाची माहिती, लवकरच होईल टेक मंचावर एंट्री
दुसरीकडे DigitalChatStation ने अलीकडेच असा दावा केला होता कि रियलमी आपला नवीन फोन MediaTek Dimensity 700 सह सादर करण्याची योजना बनवत आहे. आशा आहे कि हा Realme RMX3121 असेल. पण याची पुष्टी करता येत नाही. तसेच टिप्सटरने माहिती दिली होती कि फोन LCD पॅनल आणि टियरड्रॉप नॉच, चौकोनी आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आणि 5,000mAh बॅटरीसह येईल.
