Vivo च्या S-सीरीजला मिळणारी लोकप्रियता पाहता कंपनी या सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन घेऊन येण्याचा विचार करत आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरीजचा नवीन हँडसेट Vivo S7t काही सर्टिफिकेशन साइट जसे कि 3C सर्टिफिकेशन आणि गीकबेंचवर दिसला होता. आता फोन गुगल प्ले कंसोल वर मॉडेल नंबर Vivo V2048A सह दिसला आहे. तसेच बोलले जात आहे कि Vivo S7t एक 5G फोन असेल जो आधी आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये एंट्री करेल. त्यानंतर दुसऱ्या मार्केट मध्ये सादर केला जाईल.
डिजाइन
फोनच्या फीचर्स व्यतिरिक्त लिस्टिंग मध्ये फोनचा रेंडर पण दाखवण्यात आला आहे, त्यामुळे डिवाइसच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. रेंडरनुसार फोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच फ्रंटला दिली जाईल, ज्यात सेल्फी कॅमेरा असेल. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजवीकडे असतील. तर डावीकडे अजून एक बटन दिसत आहे जो गुगल असिस्टंटसाठी असू शकतो. फोनच्या रियर लुकची माहिती यात देण्यात आली नाही. पण, हि फोनची शेवटची डिजाइन म्हणता येणार नाही.
हे देखील वाचा : सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo X60 Pro+ फोन, Samsung Galaxy S21 ला देईल टक्कर
फीचर्स
Vivo S7t च्या गुगल प्ले कंसोल लिस्टिंगवर समोर आलेल्या माहितीनुसार यात 480 DPI आणि FHD+ डिस्प्ले असेल जो 1,080 X 2,404 पिक्सल रिजोल्यूशन सह येईल. तसेच, डिवाइस मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 800 चिपसेट असेल जो 8GB रॅम आणि अँड्रॉइड 11 सह येईल.
काही दिवसांपूर्वी DigitalChatStation नावाच्या टिप्सटरने दावा केला होता कि Vivo S7t चे स्पेसिफिकेशन्स याआधी लॉन्च करण्यात आलेल्या Vivo S7 प्रमाणेच असतील. अजूनतरी कंपनीकडून वीवो एस7टीच्या लॉन्च बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.
हे देखील वाचा : 10 दिवसांत चौथा फोन घेऊन आली वीवो, आज लाॅन्च केला 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी असलेला Vivo Y31 स्मार्टफोन
Vivo S7 चे स्पेसिफिकेशन्स
वीवो एस7 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 91.2 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह 6.44-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे. फोन मध्ये 256GB स्टोरेजसह 8GB रॅम आहे. फोन अँड्रॉइड 11-आधारित फ़नटच किंवा ओरिजिनओएसवर चालतो. इतकेच नव्हे तर फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000mAh ची बॅटरी पण देण्यात आली आहे.

वीवो S7 मध्ये फोटोग्राफीसाठी 64MP प्राइमरी सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि 2MP मोनो सेंसरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 44MP चा सॅमसंग GH1 प्राइमरी सेंसर आणि 8MP ची अल्ट्रा-वाइड सेकेंडरी लेंस आहे. कनेक्टिविटी फीचर्स पाहता यात 5G SA / NSA, डुअल 4G VoLTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1, GPS + GLONASS, NFC आणि USB टाइप- C पोर्टचा समावेश आहे.















