Home Featured लॉकडाउन नंतर लगेचच Realme TV होऊ शकते भारतात लॉन्च, महत्वाची माहिती आली समोर

लॉकडाउन नंतर लगेचच Realme TV होऊ शकते भारतात लॉन्च, महत्वाची माहिती आली समोर

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Realme ब्रँड स्मार्टफोन बाजारात हिट झाल्यानंतर इतर गॅजेट्स आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स क्षेत्रात हात अजमावत आहे. स्मार्ट बँड आणि स्मार्ट वॉच सोबतच कंपनी स्मार्ट टेलीविजनची निर्मिती पण करत आहे. काही दिवसांपूर्वी रियलमीने सांगितले होते कि कंपनी आपल्या स्मार्ट टेलीविजन वर काम करत आहे आणि Realme Smart TV जगात पहिल्यांदा सर्वात आधी भारतातच लॉन्च होईल. काही दिवसांपूर्वी Realme TV इंडियन सर्टिफिकेशन्स साइट वर दिसली होती तर आता स्मार्टटीव्हीचा रिमोट पण सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट करण्यात आला आहे.

Realme TV रिमोट ब्लूटूथ सर्टिफिकेशन साइट Bluetooth SIG वर दिसला आहे. या वेबसाइट वर रिमोट RTRC1 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सर्टिफिकेशन्स साइटने रिमोट ब्लूटूथ 5.0 ने सर्टिफाइड केला आहे. रिमोट सर्टिफाइड झाल्यामुळे असे म्हणता येईल कि Realme TV ची निर्मिती जवळपास पूर्ण झाली आहे आणि रियलमी कोणत्याही क्षणी आपला नवीन स्मार्टटीव्ही सादर करू शकते. चर्चा अशी आहे कि देशातील लॉकडाउन संपल्यावर लगेचच रियलमी आपला Realme TV बाजारात आणू शकते.

Realme TV

Realme Smart TV गेल्या आठवड्यात BIS म्हणजे ब्यूरो आफ इंडियन स्टॅंडर्ड वर लिस्ट केला गेला होता. या लिस्टिंग मध्ये रियलमी टीव्ही JSC55LSQLED मॉडेल नंबर सह लिस्ट केली गेली होती. या लिस्टिंग मध्ये टीव्हीच्या स्क्रीनची पण माहिती मिळाली आहे. इथे Realme TV 43 इंचाच्या पॅनल सह लिस्ट आहे. आशा आहे कि रियलमी टीव्हीचा बेस मॉडेल 43 इंचाचा असेल आणि कंपनी या साईज पेक्षा मोठे डिस्प्ले असलेले मॉडेल्स पण बाजारात आणेल.

रियलमीने आधीच सांगितले आहे कि कंपनी भारतात आपली स्मार्टटीवी पण लॉन्च करेल. Realme ब्रँडच्या पहिल्या स्मार्ट टेलीविजन वर काम करत आहे आणि हि स्मार्ट टीवी यावर्षी दुसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल. Realme TV बाबत माधव म्हणाले कि जगात पहिल्यांदा भारतातच लॉन्च होईल आणि भारतीय यूजर्सना केंद्रस्थानी ठेऊन रियलमी टीवी मध्ये खास कस्टमाइजेशन केले जात आहे. Realme Smart TV एप्रिल पासून जून दरम्यान भारतात लॉन्च होईल. आशा आहे कि Realme Smart TV फक्त कमी किंमतीत येणार नाही तर इंडियन यूजर्सच्या दृष्टीने टीवी मध्ये कंटेंट पण मिळेल.

Realme Watch

Realme Watch ची माहिती स्वतः रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी दिली आहे. माधव सेठ यांनी फक्त हे बाब स्पष्ट केली तर कंपनी लवकरच भारतात आपला पहिला स्मार्टवॉच लॉन्च करणार आहे त्याचबरोबर माधव यांनी या Smart Watch चा लुक पण शेयर केला आहे. कालच म्हणजे 25 मार्चला झालेल्या आस्क माधवच्या सेशन मध्ये माधव सेठ यांनी इंटरव्यू मध्ये रियलमी की स्मार्ट वॉच हातात घातला होता. स्मार्ट वॉच मनगटावर बांधून माधव सेठ यांनी आगामी रियलमी वॉचचा लुक समोर ठेवला आहे.

रियलमी स्मार्टवॉच चौकोनी आकाराच्या डॉयलचा आहे. वीडियो मध्ये माधव यांनी ब्लॅक कलरचा स्मार्टवॉच परिधान केला होता. माधव यांनी आगामी Realme SmartWatch ची माहिती दिली नाही पण स्पष्ट केले आहे कि कंपनी या स्मार्टवॉचच्या कमला लागली आहे आणि येत्या काही दिवसांत लवकरच हा इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे या सेशन मध्ये माधव सेठ यांनी Realme 6 Pro स्मार्टफोनचा पर्पल कलर वेरिएंट पण लॉन्च होणार असल्याची माहिती दिली आहे.