Realme ने सप्टेंबर मध्ये आपल्या ‘एक्स सीरीज’ चा विस्तार करत चीन मध्ये दोन नवीन स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro लाॅन्च केले होते. टेक मंचावर एंट्री करताच इंडियन रियलमी फॅन पण या स्मार्टफोन्सची वाट बघू लागले होते, त्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला होता तसेच कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी फोनचा फोटो शेयर केला होता, तसेच आता रियलमी एक्स7 स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट रियलमी इंडिया वर पण लिस्ट झाला आहे.
Realme X7 Pro रियलमी इंडिया वेबसाइट वरील सपोर्ट पेज सेग्मेंट मध्ये दिसला आहे, जो टिपस्टर मुकुलशर्मा ने स्पाॅट केला आहे. टिपस्टर नुसार कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर फोनचा सपोर्ट पेज लाईव करण्यात आला आहे.सपोर्ट पेज लाईव झाल्यानंतर आशा व्यक्त केली जात आहे कि येत्या काही दिवसात कंपनी या फोनच्या भारतातील लाॅन्चची घोषणा पण करेल. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये ‘रियलमी एक्स7’ सीरीज चीनच्या बाहेर थायलंड आणि तैवान मध्ये पण लाॅन्च झाली आहे.
So the Realme X7 Pro has been listed on the company's official support page in India.#Realme #RealmeX7Pro pic.twitter.com/JDdE5Ezlvx
— Mukul Sharma (@stufflistings) December 24, 2020
हे देखील वाचा : 44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह लॉन्च झाला Vivo V20 (2021), जाणून घ्या किंमत
Realme X7
रियलमी एक्स7 मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 800U प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली-जी57 जीपीयू देण्यात आला आहे. फोन मध्ये रॅम 8 जीबी आहे आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. रियलमीचा हा फोन अँड्रॉइड 10 बेस्ड रियलमी युआय वर चालतो. हँडसेट मध्ये पावर देण्यासाठी 4300mAh ची बॅटरी आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme X7 Pro
रियलमी एक्स7 प्रो मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज, सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्ज आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 1000+ प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी 9-कोर माली-G77 ग्राफिक्स प्रोसेसर आहे. हँडसेट मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आहे आणि 256 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोन मध्ये कॅमेरा स्पेक्स Realme X7 सारखेच आहेत. फोनला पावर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे देखील वाचा : Huawei ने लॉन्च केले दोन दमदार 5G स्मार्टफोन्स Nova 8 आणि Nova 8 Pro, येत आहेत जबरदस्त फीचर्ससह
कॅमेरा
दोन्ही फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आणि एक सारख्या लेंस देण्यात आल्या आहेत. कॅमेऱ्यात देण्यात आलेल्या अपर्चर मध्ये काही फरक आहे. Realme X7 आणि X7 Pro मध्ये अपर्चर f/1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर, (X7 मध्ये अपर्चर f/2.3) आणि (X7 Pro मध्ये अपर्चर f/2.25) सह अल्ट्रा-वाइड-अँगल 8 मेगापिक्सल सेंसर, अपर्चर /2.4 सह 2 मेगापिक्सलचा ब्लॅक आणि वाइट पोर्टेट सेंसर व अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी (Realme X7 मध्ये अपर्चर f/2.5) आणि (Realme X7 Pro मध्ये अपर्चर f/2.45) सह 32 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे.
रियलमी एक्स7 प्रो व्हिडीओ