Home बातम्या लाँच न झालेला Redmi 12 वेबसाइटवर लिस्ट; कंपनीनं हटवण्यापूर्वी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समजले

लाँच न झालेला Redmi 12 वेबसाइटवर लिस्ट; कंपनीनं हटवण्यापूर्वी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समजले

Highlights
  • हा रेडमी पोर्तुगीज वेबसाइटवर दिसला आहे.
  • रॅम व्हेरिएंट व प्राइसचा खुलासा झाला आहे.
  • स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील समोर आली आहे.

Redmi 12 ब्रँडचा नेक्स्ट मिडबजेट मोबाइल फोन असेल ज्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. कंपनीनं सध्या लाँच डेट सांगितली नाही परंतु रेडमी पोर्तुगाल वेबसाइटवर चुकून फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आणि ह्याची किंमत व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला. हे पेज नंतर काढून टाकण्यात आलं आहे परंतु त्यापूर्वी जी माहिती समोर आली ती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi 12 ची किंमत

कंपनी वेबसाइटवर काही काळ लिस्ट झालेल्या प्रोडक्ट पेजवरून फोनची किंमत देखील समोर आली होती. ही किंमत 209.99 युरो होती जी भारतीय करंसीनुसार 18,500 रुपयांच्या आसपास आहे. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत आहे ज्यात 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. लिस्टिंगमध्ये फोनचा ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू कलर समोर आला आहे.

Redmi 12 स्पेसिफिकेशन्स