लाँच न झालेला Redmi 12 वेबसाइटवर लिस्ट; कंपनीनं हटवण्यापूर्वी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समजले

Highlights

  • हा रेडमी पोर्तुगीज वेबसाइटवर दिसला आहे.
  • रॅम व्हेरिएंट व प्राइसचा खुलासा झाला आहे.
  • स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील समोर आली आहे.

Redmi 12 ब्रँडचा नेक्स्ट मिडबजेट मोबाइल फोन असेल ज्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. कंपनीनं सध्या लाँच डेट सांगितली नाही परंतु रेडमी पोर्तुगाल वेबसाइटवर चुकून फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आणि ह्याची किंमत व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला. हे पेज नंतर काढून टाकण्यात आलं आहे परंतु त्यापूर्वी जी माहिती समोर आली ती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi 12 ची किंमत

कंपनी वेबसाइटवर काही काळ लिस्ट झालेल्या प्रोडक्ट पेजवरून फोनची किंमत देखील समोर आली होती. ही किंमत 209.99 युरो होती जी भारतीय करंसीनुसार 18,500 रुपयांच्या आसपास आहे. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत आहे ज्यात 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. लिस्टिंगमध्ये फोनचा ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू कलर समोर आला आहे.

Redmi 12 स्पेसिफिकेशन्स

  • 6.79″ FHD+ 90Hz Display
  • 50MP Rear Camera
  • MediaTek Helio G88
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 18W 5,000mAh battery

  • स्क्रीन : रेडमी 12 मध्ये 6.79 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले असल्याचा खुलासा वेबसाइटवर झाला आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेट देते.
  • प्रोसेसर : आगामी रेडमी फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याची माहिती समोर आली आहे.
  • रॅम/मेमरी : फोनचे दोन रॅम व्हेरिएंट्स वेबसाइटवर दिसले रहात ज्यात 4जीबी रॅम आणि 8जीबी रॅम देण्यात आला आहे. हे 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेज ऑप्शनसह विकले जातील तसेच 1टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतील.
  • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Redmi 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो/डेप्थ सेन्सरचा समावेश असेल.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रेडमी 12 स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल असं वेबसाइटवर सांगण्यात आलं आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी Redmi 12 मध्ये 5,000एमएएच बॅटरी आहे. तसेच ह्या फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग मिळेल.
  • अन्य फीचर्स : रेडमी 12 मध्ये IP53 रेटिंग, NFC, IR Blaster सोबतच Bluetooth 5.3 सारखे फीचर्स मिळतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here