Home बातम्या Redmi 12 अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला, कमी किंमतीत लवकरच येऊ शकतो बाजारात

Redmi 12 अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला, कमी किंमतीत लवकरच येऊ शकतो बाजारात

Highlights
  • Redmi 12 स्मार्टफोन IMDA, BIS, NBTC, EEC सर्टिफिकेश साइट्सवर दिसला आहे.
  • Xiaomi हा फोन 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आणू शकते.
  • Redmi 12 कंपनीचा एक नवीन बजेट स्मार्टफोन असू शकतो.

Xiaomi लवकरच टेक मार्केटमध्ये आपला नवीन Redmi स्मार्टफोन लाँच करू शकते. हा फोन Redmi 12 नावानं अनेक बाजारांमध्ये सादर केला जाईल, अशी अपेक्षा आहे. परंतु कंपनीनं आतापर्यंत या हँडसेटबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. परंतु, लाँच पूर्वीच हा बजेट स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला आहे, ज्यामुळे लवकरच हा बाजारात येईल, असा अंदाज लावला जात आहे.

सर्टिफिकेशन्स साइट्सवर दिसला रेडमी 12

हा डिवाइस चार सर्टिफिकेशन वेबसाइट्स- EEC, IMDA, ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) आणि NBTC वर दिसला आहे. Redmi स्मार्टफोनची नवीन लिस्टिंग ह्याच्या लाँचकडे इशारा करते. चला एक नजर Redmi 12 बाबत समोर आलेल्या माहितीवर टाकूया.

रेडमी 12 सर्टिफिकेशन डिटेल्स

फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स, जसे की ह्याच्या डिस्प्ले, साइज, कॅमेरा स्पेक्स आणि प्रोसेसरची अद्याप समोर आलेली नाही. तसेच Xiaomi नं डिवाइस ची लाँच डेटची कोणतीही माहीत दिली नाही, परंतु फोनला जेवढे सर्टिफिकेशन मिळाले आहेत ते पाहता Redmi 12 पुढील महिन्यात किंवा त्याआधीच बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.