Redmi 12 अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला, कमी किंमतीत लवकरच येऊ शकतो बाजारात

Highlights

  • Redmi 12 स्मार्टफोन IMDA, BIS, NBTC, EEC सर्टिफिकेश साइट्सवर दिसला आहे.
  • Xiaomi हा फोन 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आणू शकते.
  • Redmi 12 कंपनीचा एक नवीन बजेट स्मार्टफोन असू शकतो.

Xiaomi लवकरच टेक मार्केटमध्ये आपला नवीन Redmi स्मार्टफोन लाँच करू शकते. हा फोन Redmi 12 नावानं अनेक बाजारांमध्ये सादर केला जाईल, अशी अपेक्षा आहे. परंतु कंपनीनं आतापर्यंत या हँडसेटबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. परंतु, लाँच पूर्वीच हा बजेट स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला आहे, ज्यामुळे लवकरच हा बाजारात येईल, असा अंदाज लावला जात आहे.

सर्टिफिकेशन्स साइट्सवर दिसला रेडमी 12

हा डिवाइस चार सर्टिफिकेशन वेबसाइट्स- EEC, IMDA, ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) आणि NBTC वर दिसला आहे. Redmi स्मार्टफोनची नवीन लिस्टिंग ह्याच्या लाँचकडे इशारा करते. चला एक नजर Redmi 12 बाबत समोर आलेल्या माहितीवर टाकूया.

रेडमी 12 सर्टिफिकेशन डिटेल्स

  • फोन एनबीटीसी वेबसाइटवर मॉडेल नंबर 23053RN02A सह दिसला आहे.
  • हा डिवाइस BIS, IMDA आणि EEC सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर देखील दिसला होता, ज्यामुळे फोनच्या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे.
  • लिस्टिंगमधून आगामी Redmi स्मार्टफोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशनचा खुलासा झालेला नाही.
  • Redmi 12 स्मार्टफोन आधी FCC आणि IMEI सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला होता. त्यानुसार हा 4जी स्मार्टफोन आहे असं समजलं आहे.
  • हा MIUI 14 आउट ऑफ द बॉक्स चालतो, जो Android 13 वर आधारित असू शकतो.
  • डिवाइस मॉडेल नंबर MDY-12-EA असलेल्या चार्जरसह दिसला होता.
  • हा डिवाइस 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो.

फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स, जसे की ह्याच्या डिस्प्ले, साइज, कॅमेरा स्पेक्स आणि प्रोसेसरची अद्याप समोर आलेली नाही. तसेच Xiaomi नं डिवाइस ची लाँच डेटची कोणतीही माहीत दिली नाही, परंतु फोनला जेवढे सर्टिफिकेशन मिळाले आहेत ते पाहता Redmi 12 पुढील महिन्यात किंवा त्याआधीच बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here