Home बातम्या शाओमी करणार आहे धमाका, कमी किंमतीत 25 सप्टेंबरला लॉन्च होईल Redmi 8A

शाओमी करणार आहे धमाका, कमी किंमतीत 25 सप्टेंबरला लॉन्च होईल Redmi 8A

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi च्या रेडमी ए सीरीज मध्ये किफायती हँडसेट लॉन्च केले जातात. या सीरीज मध्ये आतापर्यंत कंपनीने Redmi 6A आणि Redmi 7A हँडसेट लॉन्च केले आहेत. तसेच आता कंपनीने अधिकृतपणे Redmi 8A लॉन्च डेटचा खुलासा केला आहे.

शाओमी इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार जैन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे कि Redmi 8A भारतात 25 सप्टेंबरला लॉन्च केला जाईल. या ट्विट मध्ये लॉन्च डेट व्यतिरिक्त फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती देण्यात आलेली नाही. ट्विट मध्ये जो फोटो वापरण्यात आला आहे त्यात फोनच्या फ्रंटची झलक दिसत आहे.

यावरून अंदाज लावला जाऊ शकतो कि अपकमिंग फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्लेचा वापर केला जाईल. Redmi 8A कंपनीच्या लोकप्रिय हँडसेट रेडमी 7ए चा अपग्रेडेड वर्जन असेल. अलीकडेच M1908C3KE मॉडेल नंबर सह हा स्मार्टफोन TENAA वर लिस्ट केला गेला होता, ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइनची माहिती मिळाली होती.

हे देखील वाचा: 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह समोर आला OnePlus 7T, 26 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च

डिजाइन

टेना लिस्टिंग नुसार फोनच्या डिस्प्ले मध्ये टॉपला वॉटरड्रॉप नॉच असेल. यात एक रियर कॅमेरा आहे आणि रेडमीची ब्रॅण्डिंग फ्रंट व रियर पॅनल वर दिसली होती. तसेच या डिवाइस मध्ये कोई फिंगरप्रिंट सेंसर नव्हता.

स्पेसिफिकेशन्स

लिस्टिंग नुसार हा स्मार्टफोन 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले आणि 2 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर सह येईल. टेना लिस्टिंग वरून समजले आहे कि हँडसेटचे तीन वेरिएंट असतील – 2 जीबी, 3 जीबी आणि 4 जीबी रॅम. हे रॅम वेरिएंट क्रमशः 16 जीबी, 32 जीबी आणि 64 जीबी स्टोरेज सह येतील.

हे देखील वाचा: 48 MP कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला Nokia 7.2, जाणून घ्या याची खासियत

या डिवाइस मध्ये 512 जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्ड साठी सपोर्ट असेल. बॅटरी 5,000 एमएएच ची आहे. परंतु कंपनीने अधिकृतपणे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती दिली नाही.