8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह समोर आला OnePlus 7T, 26 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च

OnePlus ने सांगितले आहे कि कंपनी टेक मंचावर आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत नवीन स्मार्टफोन आणणार आहे. कंपनी येत्या 26 सप्टेंबरला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून जगासमोर OnePlus 7T सादर केला जाईल. काही दिवसांपूर्वी OnePlus चे CEO Pete Lau ने या स्मार्टफोनचा फोटो शेयर केला होता ज्यावरून OnePlus 7T च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली होती. आता OnePlus 7T बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट करण्यात आला आहे ज्यावरून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

OnePlus 7T चीनी बेंचमार्किंग साइट वर OnePlus HD1903 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग काल म्हणजे 18 सप्टेंबरची आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या नावचा खुलासा केला नाही पण बोलले जात कि हा स्मार्टफोन OnePlus 7T नावाने मार्केट मध्ये येईल. गीकबेंच वर OnePlus चा हा स्मार्टफोन 8 जीबी च्या पावरफुल रॅम सह दाखवण्यात आला आहे.

गीकबेंच वर कथित OnePlus 7T एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे वहीं प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन चिपसेट असण्याचे स्पष्ट झाले आहे. आशा आहे कि OnePlus 7T मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट मिळेल. गीकबेंच लिस्टिंग नुसार OnePlus 7T मध्ये 1.78गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असेलला आक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. स्कोरिंग बद्दल बोलायचे तर OnePlus 7T ला सिंगल कोर मध्ये 791 तसेच मल्टी कोर मध्ये 2955 स्कोर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 48 MP कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला Nokia 7.2, जाणून घ्या याची खासियत

OnePlus 7T डिजाईन

मागच्या भागाची डिजाइन तर लीक झालेल्या फोटोज सारखी आहे. फोनच्या मागे सर्कुलर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात तीन कॅमेरा सेंसर हॉरिजोंटली आहेत आणि एक फ्लॅश लाइट त्या कॅमेरा सेंसरच्या खाली आहे. डिवाइस मध्ये कॅमेरा सेटअपच्या खाली कंपनीचा लोगो आणि बॉटमला कंपनीचे नाव आहे. अजूनतरी डिवाइसच्या फ्रंटचे फोटो आले नाही पण लीक झालेल्या फोटोजच्या आधारवर म्हणता येईल कि फोन मध्ये पॉप-अप कॅमेरा असेल.

OnePlus 7T स्पेसिफिकेशन्स

आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट असेल. त्याचबरोबर यात 6.55-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असेल. अफवा पाहता फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 48 मेगापिक्सल सेंसर, 12 मेगापिक्सल टेलीफोटो सह 2x झूम आणि अल्ट्रा-वाइड 16-मेगापिक्सल सेंसर आहे. सेल्फी साठी हँडसेट मध्ये 16-मेगापिक्सलचा सेंसर असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,800mAh बॅटरी Warp चार्ज 30T, एंडरॉयड 10 बेस्ड ऑक्सिजनओएस सह नवीन माइक्रो मोड पण असेल.

हे देखील वाचा: OPPO K5 होने वाला आहे लॉन्च, VOOC 4.0 टेक्नॉलॉजी सह Redmi K20 Pro ला देईल टक्कर

OnePlus TV

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार OnePlus TV 55-इंचाच्या स्क्रीन साइज सह येईल. तसेच यात QLED डिस्प्ले दिला जाईल. इतकेच नव्हे तर, कंपनीने स्पष्ट इशारा केला होता कि याच्या एका वेरिएंट मध्ये 4K रेजॉलूशन असेल. कंपनी द्वारा कन्फर्म करण्यात आलेल्या फीचर्स नुसार यात डॉल्बी विजन टेक्नॉलजी दिली जाईल. हा HDR 10 चा अपग्रेडेड वेरियंट आहे. तसेच वनप्लस टीवी मध्ये 8 इन-बिल्ट स्पीकर असतील. हे स्पीकर 50 वॉट पावर सह येतील. पावरफुल साउंड क्वॉलिटी साठी डॉल्बी ऐटमॉस सपॉर्ट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here