सध्या भारतीय स्मार्टफोन बाजारात रियलमी मोठ्या वेगाने आपला विस्तार करत आहे. एकेकाळी ज्या बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीचा दबदबा होता तिथे आता रियलमीनं आपली जागा बनवण्यास सुरुवात केली आहे. टेक्नो, इनफिनिक्स आणि मोटोरोला देखील बजेट सेगमेंटमध्ये शानदार स्मार्टफोन सादर करत आहेत. कदाचित म्हणूनच Redmi ची K-सीरीज स्मार्टफोन भारत पुनरागमन करत आहे.
शाओमीच्या सब ब्रँड रेडमीचे Redmi K20 आणि K20 Pro दोन्ही स्मार्टफोन भारतात खूप लोकप्रिय झाले होते. रेडमीचे हे स्मार्टफोन भारतात तीन वर्षांपूर्वी सादर करण्यात आले होते. कंपनीनं ट्वीट करून करून सांगितलं आहे की, Redmi K सीरीज भारतात पुन्हा येईल. रेडमीनं आपल्या अधिकरटु ट्वीटर हँडलच्या माध्यमातून माहिती दिली आहे की ‘K’ सीरीजचा स्मार्टफोन भारतात सादर करण्यात येईल. कंपनीनं ट्विटमध्ये #RedmiKisback हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
█▓▒▓█▀██▀█▄░░▄█▀██▀█▓▒▓█
█▓▒░▀▄▄▄▄▄█░░█▄▄▄▄▄▀░▒▓█
█▓▓▒░░░░░▒▓░░▓▒░░░░░▒▓▓█????? ??? ??????? ????????? ?#RedmiKIsBack pic.twitter.com/RhmrJXW8AV
— Redmi India (@RedmiIndia) July 4, 2022
रेडमीनं ट्वीटमधून आगामी स्मार्टफोनच्या मार्केटिंग नेमची माहिती दिली नाही. रूमर्सनुसार Redmi K50i स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Redmi K50i स्मार्टफोन शाओमीच्या मिड रेंज Redmi Note 11T Pro चा रिब्रँड व्हर्जन असेल. 91mobiles नं शाओमीच्या या आगामी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स याआधीच शेयर केले आहेत. हे देखील वाचा: Xiaomi 12s Ultra ला टक्कर देण्यासाठी iQOO सज्ज; सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतेय iQOO 10 सीरीज
Redmi K50i चे स्पेसिफिकेशन्स
- 6.6-इंच FHD+ LCD डिस्प्ले
- MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर
- Android 12 बेस्ड MIUI 12.5 कस्टम स्किन
- 64MP ट्रिपल रियर कॅमेरा
- 16MP सेल्फी कॅमेरा
- 5080mAh बॅटरी, 67W फास्ट चार्जिंग
Redmi K50i स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 144Hz पिक्सल असेल. हा डिस्प्ले Dolby Vision, DC Dimming, पंच होल कटआउट, नॅरो बेझल आणि कोर्निंग ग्लास लेयर सह येतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी ARM Mali-G610 MC6 GPU चा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. रेडमीच्या या फोनमध्ये Android 12 आधारित MIUI 13 कस्टम स्किन देण्यात आली आहे.
Redmi K50i स्मार्टफोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. फोनमध्ये Hi-Res ऑडियो, Dolby Atmos आणि स्टीरियो स्पिकर असे जबरदस्त फीचर्स मिळतात. कनेक्टव्हिटीसाठी 3.5mm ऑडियो जॅक, 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.3, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्ट मिळतो. हे देखील वाचा: चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo अडचणीत? देशात 44 ठिकाणी ईडीची धाड
कॅमेरा सेगमेंट पाहता, Redmi K50i स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनमध्ये 64MP चा Samsung GW1 सेन्सर प्रायमरी कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे. सोबतीला 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. या रेडमी फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5080mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
