Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येतेय iQOO 10 सीरीज

शाओमीनं चीनमध्ये कालच एक नवीन स्मार्टफोन सीरिज Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर केली आहे. हा क्वॉलकॉमचा नवीन आणि पावरफुल चिपसेट आहे. आता विवोच्या सब-ब्रँड iQOO नं देखील Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट असलेल्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. कंपनी लवकरच iQOO 10 सीरीजचे स्मार्टफोन लाँच करणार आहे.

आयकूच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनची माहिती गेले कित्येक महिने इंटरनेट लीक होत आहे. iQOO 10 लाईनअप बाबत लीक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे या सीरीजचे iQOO 10 आणि iQOO 10 Pro असे दोन स्मार्टफोन या महिन्याच्या अखेरपर्यंत होम मार्केट चीनमध्ये लाँच केले जाऊ शकतात. आतापर्यंत आयकूनं iQOO 10 सीरीजच्या ऑफिशियल डेटची घोषणा केली नाही. परंतु कंपनीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंट च्या माध्यमातून iQOO 10 सीरीज टीज करण्यास सुरुवात केली आहे.

प्रोसेसरची माहिती आली समोर

iQOO नं आपल्या चिनी सोशल मीडिया Weibo च्या अधिकृत अकाऊंटवरून कंफर्म केलं आहे की iQOO 10 सीरीज लवकरच चीनमध्ये लाँच होणार आहे. त्याचबरोबर कंपनीनं प्रोसेसरवरून देखील पडदा हटवला आहे. कंपनीनं एक पोस्ट शेयर करून माहिती दिली की iQOO 10 सीरीजचे स्मार्टफोन क्वालकॉमच्या लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर केले जातील. परंतु सीरिजचे दोन्ही फोन या प्रोसेसरसह येतील की फक्त iQOO 10 Pro मध्ये Snapdragon 8+ Gen 1 मिळेल, हे मात्र कंपनीनं स्पष्ट केलं नाही. हे देखील वाचा: चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo अडचणीत? देशात 44 ठिकाणी ईडीची धाड

iQOO 10 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

iQOO 10 Pro स्मार्टफोनबद्दल बोलले जात आहे की यात 6.78-इंचाचा 2K+ AMOLED डिस्प्ले देण्यात येईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. तसेच वर सांगतिल्याप्रमाणे iQOO च्या या आगामी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज असू शकते. हे देखील वाचा: इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर होणार लाखोंची बचत; बॅटरी असणाऱ्या व्हेइकल्ससाठी महत्वाचा निर्णय

फोटोग्राफीसाठी आगामी आयकू 10 प्रोमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल, सोबत 50MP ची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 14.6MP चा टेलीफोटो कॅमेरा दिला जाईल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. iQOO 10 Pro स्मार्टफोनमध्ये Android 12 आधारित OriginOS मिळेल. तसेच स्मार्टफोनमध्ये 4,550mAh ची बॅटरी आणि 200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते. कंपनी iQOO 10 Legend BMW Edition देखील लाँच करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here