Home बातम्या Redmi Note 12R 5G लाँच! पाहा कसे आहेत स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत

Redmi Note 12R 5G लाँच! पाहा कसे आहेत स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत

Highlights
  • नवीन रेडमी फोन चायना मध्ये लाँच झाला आहे.
  • ह्यात Snapdragon 4 Gen 2 आहे.
  • फोनची विक्री 4 मेमरी व्हेरिएंट्समध्ये होईल.

शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12R लाँच केला आहे. हा जगातील पहिला मोबाइल फोन आहे जो Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह मार्केटमध्ये आला आहे. हा क्वॉलकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो अलीकडेच सादर करण्यात आला आहे. रेडमी नोट 12आर 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi Note 12R स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 12R ची किंमत

रेडमी नोट 12आर चीनमध्ये चार व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत CNY 999 (जवळपास 11,300 रुपये) आहे. तसेच 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज CNY 1099 (जवळपास 12,400 रुपये) तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज CNY 1499 (जवळपास 16,900 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. सर्वात मोठ्या 8जीबी+256जीबी व्हेरिएंटची किंमत CNY 1799 (जवळपास 20,300 रुपये) आहे.