Redmi Note 12R 5G लाँच! पाहा कसे आहेत स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत

Highlights

 • नवीन रेडमी फोन चायना मध्ये लाँच झाला आहे.
 • ह्यात Snapdragon 4 Gen 2 आहे.
 • फोनची विक्री 4 मेमरी व्हेरिएंट्समध्ये होईल.

शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12R लाँच केला आहे. हा जगातील पहिला मोबाइल फोन आहे जो Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह मार्केटमध्ये आला आहे. हा क्वॉलकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो अलीकडेच सादर करण्यात आला आहे. रेडमी नोट 12आर 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi Note 12R स्पेसिफिकेशन्स

 • 6.79″ FHD+ 90Hz Display
 • Qualcomm Snapdragon 4 Gen 2
 • 8GB RAM + 256GB Storage
 • 50MP Rear Camera
 • 18W 5,000mAh Battery

 • स्क्रीन : रेडमी नोट 12आर 6.79 इंचाच्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतो जी पंच-होल स्टाईलसह येते तसेच फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करते. हा डिस्प्ले आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो.
 • प्रोसेसर : रेडमी नोट 12आर अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो मीयुआय 14 सह चालतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे तसेच 2.2गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.
 • मेमरी : Redmi Note 12R चीनमध्ये तीन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ह्यात 4जीबी रॅम, 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅमचा समावेश आहे. हे मॉडेल्स 128जीबी स्टोरेज तसेच 256जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध होतील.
 • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा 5एमपी फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
 • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी नोट स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.

Redmi Note 12R ची किंमत

रेडमी नोट 12आर चीनमध्ये चार व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत CNY 999 (जवळपास 11,300 रुपये) आहे. तसेच 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज CNY 1099 (जवळपास 12,400 रुपये) तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज CNY 1499 (जवळपास 16,900 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. सर्वात मोठ्या 8जीबी+256जीबी व्हेरिएंटची किंमत CNY 1799 (जवळपास 20,300 रुपये) आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here