चीनी स्मार्टफोन निर्माता शाओमी भारतात आपल्या Y सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन म्हणजे Y3 लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीने या हँडसेटच्या लॉन्च साठी मीडिया इनवाइट पण पाठवायला सुरवात केली आहे. मीडिया इनवाइट नुसार कंपनी 24 एप्रिलला आयोजित इवेंट मध्ये Redmi Y3 लॉन्च करेल. लॉन्चच्या आधी या फोन बद्दल आता पर्यंत आलेल्या लीक व माहिती वरून बघूया कसा असेल हा स्मार्टफोन.
Redmi Y3 कंपनी द्वारा गेल्या वर्षी लॉन्च Redmi Y2 चा अपग्रेडेड वेरिएंट असेल. जरी Y3 चे नाव कंपनीने ऑफिशियली सांगितले नसले तरी ट्विट आणि ऑफिशियल मीडिया इनवाइट मध्ये Y चा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी Y3 लॉन्च करणार आहे.
शानदार डिजाइन
या स्मार्टफोन मध्ये कंपनी एक दमदार सेल्फी कॅमेरा देईल आणि याचे प्रमोशन पण कंपनी त्यानुसारच करत आहे. कंपनी हा फोन #32MPSuperSelfie च्या हॅशटॅग ने प्रमोट करत आहे. शाओमी ने ट्वीट मध्ये स्मार्टफोनच्या एका बाजूचा फोटो पण पोस्ट केला आहे, ज्यात फोनचा कॅमेरा आणि वाटर ड्रॉप नॉच आकार स्पष्ट दिसत आहे. म्हणजे या फोन मध्ये तुम्हाला रेडमी नोट 7 सारखी नॉच मिळेल. तसेच फोन मध्ये उजवीकडे वॉल्यूम रॉकर व पावर बटण मिळेल. सोबत मागे फिंगरप्रिंट सेंसर असेल जसा आपण Redmi Note 7 व Redmi Note 7 pro मध्ये बघितला आहे. तसेच आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोनच्या मागे वर्टिकल ट्रिपल कॅमेरा आणि कॅमेऱ्याखाली एलईडी लाइट असेल.
पावरफुल बॅटरी
शाओमी ने Redmi Y3संबंधित आपल्या ट्वीट मध्ये एक वीडियो पण शेयर केला आहे. या वीडियो मध्ये विचारण्यात आले आहे कि एकदा फुल चार्ज केल्यानंतर तुमचा फोन कितीवेळ चालतो. हा वीडियो बघून बोलले जात आहे कि Xiaomi Redmi Y3 कपंनी द्वारा मोठ्या व पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. या फोन मध्ये बॅटरी 4,500एमएएच किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तसेच शाओमी Redmi Y3फोन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल याची पण शक्यता आहे.
हे देखील वाचा: लॉन्चच्या आधी बघा Realme 3 Pro मध्ये काय असेल खास
उत्कृष्ट सेल्फी कॅमेरा
Xiaomi ने Redmi Y3 च्या नावासोबत फोनचे स्पेसिफिकेशन्स पण लपवून ठेवले आहेत. इतर सर्व स्पेसिफिकेशन्स लपवत कंपनी ने Redmi Y3 च्या फक्त कॅमेरा सेग्मेंटचा खुलासा केला आहे. आपल्या ट्वीट मध्ये शाओमी ने सांगितले आहे कि कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Redmi Y3 मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. फोनचा हा सेल्फी कॅमेरा कोणत्या खास फीचर्स व टेक्नॉलॉजी सह येईल हे अजून समजले नाही पण शाओमी Redmi Y3 च्या फ्रंट कॅमेऱ्याला 32MP Super Selfie कॅमेरा म्हणत आहे.
Wait till 24th April, Y? Y? Y?. Stay tuned to @XiaomiIndia for more. #YYY pic.twitter.com/IQQg3ZHDy5
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 15, 2019
रॅम व स्टोरेज
Redmi Y3 बद्दल बोलले जात आहे कि कंपनी हा फोन 2 वेरिएंट मध्ये भारतात लॉन्च करेल. डिवाइस 4जीबी रॅम व 64जीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. आशा आहे कि कंपनी या डिवाइसचा 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट सादर करेल. तर दोन्ही वेरिएंट्स समान क्षमतेच्या माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतील.
हे देखील वाचा: सॅमसंग Galaxy A80 आणि Galaxy A70 ची किंमत आली समोर, Galaxy A70 पुढल्या आठवड्यात होतील भारतात लॉन्च
एंडरॉयड व चिपसेट
बोलले जात आहे कि कंपनी आपला हा फोन एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल जो मीआईयूआई 10 वर आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी हा फोन आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 या 675 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो.
