लॉन्चच्या आधी बघा Realme 3 Pro मध्ये काय असेल खास

रियलमी त्या निवडक ब्रँड्स पॅकी एक आहे ज्यांनी थोड्याच वेळात नेमकेच स्मार्टफोन्स लॉन्च करून मजबूत युजरबेस बनवला आहे. रियलमी ने गेल्या महिन्यातच ब्रँडचा नवीन स्मार्टफोन Realme 3 लॉन्च केला होता. या फोन ने बाजारात येतात यशाचे नवीन रेकॉर्ड केले. इंडिया लॉन्च नंतर Realme 3 ने बाजारात आल्याआल्या तीनच आठवड्यांत 5 लाख यूनिट विकले. Realme 3 च्या लॉन्च सोबत कंपनी ने सांगितले होते कि Realme 3 चा अजून एक एडवांस वर्जन पण इंडियन मार्केट मध्ये येईल. हा नवीन स्मार्टफोन Realme 3 Pro नावाने लॉन्च केला जाईल जो येत्या 22 एप्रिलला बाजारात येईल. Realme 3 Pro कडून फक्त कंपनी नव्हे तर रियलमी फॅन्स तसेच स्मार्टफोन यूजर्सना पण खूप जास्त अपेक्षा आहेत. या फोन बद्दल आता पर्यंत नाके लीक्स समोर आले आहेत ज्यात Realme 3 Pro च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. जर तुम्ही पण Realme 3 Pro बद्दल उत्सुक असाल तर पुढे आम्ही Realme 3 Pro च्या लॉन्च आधीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती दिली आहे.

डिस्प्ले व डिजाईन
Realme 3 Pro कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला जाण्याची शक्यता आहे. कंपनी या डिजाईनला ड्यूड्रॉप नॉच म्हणते. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार Realme 3 Pro ग्लास डिजाईन वर सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 6.3-इंचाची स्क्रीन मिळू शकते जी फुलएचडी+ पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. फोनच्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा दिला जाईल तसेच डिस्प्ले खूपच नॅरो बेजल्स सह येईल.

Realme 3 Pro च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल जो फोनच्या डाव्या पॅनल वर ​वर्टिकल शेप मध्ये असेल. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट असेल. रिपोर्ट्स मधून समजले आहे कि Realme 3 Pro च्या बॅक पॅनल वरच ​फिंगर​प्रिंट सेंसर दिला जाईल. फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट व 3.5एमएम जॅक असेल. फोनच्या डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर असेल तर उजव्या पॅनल वर पावर बटण मिळू शकतो.

रॅम व स्टोरेज
​Realme 3 Pro बद्दल बोलले जात आहे कि कंपनी हा फोन 2 वेरिएंट मध्ये भारतात लॉन्च करेल. Realme 3 Pro च्या एका वेरिएंट मध्ये 6जीबी च्या पावरफुल रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तर दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम व 64जीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. अशा आहे कि Realme 3 Pro चे हे दोन्ही वेरिएंट्स समान क्षमतेच्या माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतील.

एंडरॉयड व चिपसेट
Realme 3 Pro संबंधित रिपोर्ट्स मधून समजले आहे कि कंपनी आपला हा फोन एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल जो कलरओएस 6.0 आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी हा फोन आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा चिपसेट 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला आहे जो फोन मध्ये स्मूथ आणि लॅग फ्री प्रोसेस करतो.

कॅमेरा सेग्मेंट
समोर आलेल्या माहिती नुसार Realme 3 Pro मध्ये 25 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो एआई ब्यूटी फिल्टर्स सह येईल. तसेच Realme 3 Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एक कॅमेरा सेंसर 16 मेगापिक्सलचा असू शकतो तर फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. हा कॅमेरा सेटअप बोका इफेक्ट सोबत सुपर स्लो मोशन वीडियो रिकॉर्डिंगला पण सपोर्ट करेल.

बॅटरी
Realme 3 Pro बद्दल कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी स्वतः एक ट्वीट केले आहे ज्यातून समजले आहे कि हा पावरफुल बॅटरी सह येईल. तसेच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Realme 3 Pro 4,045एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह सादर केला जाऊ शकतो. बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here